किनवट, परमेश्वर पेशवे l लिंगी येथील शेतकऱ्याची उनकेश्वर शिवारात रस्त्यालगत असलेल्या शेतात उभी ठेवलेली मोटरसायकल अज्ञात चोरट्याने दि. 15 फेब्रुवारी रोजी भर दिवसा सायंकाळी चार ते पाच वाजता दरम्यान चोरून नेल्याची घटना घडली आहे.

याबाबत अधिक असे की, लिंगी येथील शेतकरी शंकर भुमन्ना अन्नमवार यांचे शेत उनकेश्वर शिवारात उनकेश्वर पारवा रस्त्यावर असून ते नेहमी शेतात काम करण्यासाठी स्वतःची हिरो स्प्लेंडर मोटरसायकल क्रं.एम एच 26आज,2619 घेऊन दररोजच्या प्रमाणे आजही शेतात आले होते.

आपली ही मोटर सायकल रस्त्याच्या बाजूला असलेल्या शेताजवळ उभी ठेवली आणि हा शेतकरी आपला शेतातील काम करत असताना त्यांची ही मोटरसायकल सायंकाळी चार ते पाच वाजताच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी मोटरसायकल मालक शंकर अन्नमवार मांडवी पोलीस स्टेशनला फिर्याद दिली आहे.



