नांदेड| नांदेड एज्युकेशन सोसायटी संचलित सायन्स कॉलेजच्या मुलांच्या वस्तीगृहात सोमवार (दि.१२ जानेवारी) रोजी राष्ट्रमाता, राजमाता जिजाऊ मॉ साहेब व स्वामी विवेकानंद यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.


कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ एलपी शिंदे होते तर प्रमुख अतिथी म्हणून नांदेड एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष सीए डॉ. प्रवीण पाटील, डॉ. बालाजी कोंपलवार, पीपल्स कॉलेजचे उपप्राचार्य डॉ. अशोक सिद्धेवाड यांची उपस्थिती होती. प्रारंभी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते जिजाऊ मॉ साहेब व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

नांदेड एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष सीए डॉ. प्रवीण पाटील, डॉ. बालाजी कोंपलवार, पीपल्स कॉलेजचे उपप्राचार्य डॉ. अशोक सिद्धेवाड यांनी राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जीवनचरित्रावर प्रकाश टाकला व उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. राजेश आचेगावे यांनी केले. सूत्रसंचलन प्रा. शशिकांत द्रोणाचार्य तर आभारप्रदर्शन प्रा. आकाश करंडे यांनी केले. याप्रसंगी डॉ. विनोद चव्हाण, डॉ.. प्रदीप सातव, ग्रंथपाल प्रशांत सुतकर, प्रा. नरसिंग भालके, प्रा. अश्विन बोरीकर, प्रा, विजयकिरण नरवाडे यांची उपस्थिती होती.



