नांदेड| शुक्रवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे नांदेड कौठा भागात सुरू असलेल्या पंडित प्रदीपजी मिश्रा यांच्या शिवपुराण कथा श्रवणासाठी बाहेर गावाहून आलेल्या असंख्य भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी नांदेड दक्षिणचे आमदार मोहनराव हंबर्डे यांनी तात्काळ प्रशासकीय अधिकाऱ्यांसह कथास्थळी घाव घेऊन तेथे अडकलेल्या हजारो भाविकांना सुरक्षित स्थळी हलविले. शुक्रवारी शिवमहापुराण कथेचा पहिला दिवस होता. कथा संपतात शहर व परिसराला मुसळधार पावसाने झोडपून काढले. मोदी मैदान येथील कथा मंडपात पाणीच पाणी साचले होते. बाहेर गावाहून आलेल्या व तिथे आश्रय घेतलेल्या भाविकांना रात्र कशी काढावी या चिंतेने ग्रासले होते.
योग्य नियोजनाभावी महाशिवपुराण कथास्थळी मंडपात गुडघाभर पाणी साचले. होते. मंडपात बाहेर गावांतील हजारो भक्त मंडळी मुक्कामी थांबले होते. ही बाब समजतातनांदेड दक्षिणचे धडाडीचे आमदार मोहनराव अण्णा हंबर्डे यांनी महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम, उपायुक्त स.अजितपालसिंघ संधूजी, सहाय्यक आयुक्त, आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत सर्व कर्मचारी, प्रशासकीय यंत्रणा सोबत घेत कथास्थळ गाठले. तेथील परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन आमदार मोहनराव हंबर्डे यांनी तात्काळ प्रशासकीय यंत्रणेला सूचना देऊन ग्राउंडवर स्कूल बसच्या गाड्या मागविल्या आणि भाविकांना सुरक्षित ठिकाणी हलविले.
स्कूल बस संघटनेचे अध्यक्ष निखिल लातूरकर यांना फोन करून स्कूलच्या बसेस मागवल्या आणि त्यांनीही वेळेवर स्कूलच्या बसेस पाठवल्यामुळे अडकलेल्या सर्व भाविकांना सुरक्षित स्थळी घेऊन जाण्यास मदत मिळाली भाविकांना ओम गार्डन, मातोश्री मंगल कार्यालय. गुरुद्वारा कौठा येथे राहण्याची व्यवस्था तसेच काळेश्वर मंदिर ट्रस्ट तर्फे राहण्याची व जेवण्याची व्यवस्था करण्यात येत आहे. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांचीही यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते. प्रसंगावधान राखून आमदार मोहनराव हंबर्डे यांनी दाखविलेल्या. तत्परतेबद्दल तमाम भाविकांनी त्यांचे आभार मानले