नांदेड| कंधार तालुक्यातील शिराढोण ग्रामपंचायतीच्या ग्रामविकास अधिकाऱ्यांकडून गैरव्यवहार झाल्याने जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनाच चौकशीसह दोषींविरुद्ध कारवाईचे साकडे घालण्यात आले त्यांची नुकतीच भेट घेऊन श्याम कपाळे व सहकांऱ्यानी याबाबत निवेदन दिले आहे.


अधिक माहिती अशी की, ग्रामपंचायत कार्यालय, शिराढोण सन् २०२३ – २४ या आर्थिक वर्षांत घनकचरा व्यवस्थापनासाठी रु.तिन लाख रुपयांचे डस्ट बीन खरेदी केल्याची खोटी बिले दाखवून ग्रामपंचायतीच्या वतिने सदरची रक्कम ऑगस्ट २०२४ मध्ये स्थानिक ग्रामविकास अधिकारी भीमाशंकर मुंजाळ यांच्याच वैयक्तिक मालकीच्या सुजल एन्टरप्रायजेस ला जास्तीत जास्त प्रमाणात देण्यात आलेली असून प्रत्यक्षात गांवात कुठेही डस्ट बीन नसल्याचाही आरोप निवेदनातून करण्यात आलेला असून या निवेदनावर गजानन पांडागळे,श्याम कपाळे,लक्ष्मण बोंदकुले,माधव भुरे,राम पांडागळे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.


महत्वाचे म्हणजे, ग्रामपंचायतीच्या आर्थिक गैरव्यवहाराच्या या प्रकरणात थेट जिल्हाधिकाऱ्यांनाच पुराव्यानिशी तक्रार करुन चौकशीसह दोषींविरुद्ध कायदेशीर कारवाईचे साकडे घालण्यात आल्यानंतर त्यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिल्याने मोठी खळबळ निर्माण झाली असून या प्रकरणात जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतीचे याकडे लक्ष लागून आहे.




