Friday, June 26

Tag: to the District Collector!

Shiradhon Gram Panchayat : शिराढोण ग्रामपंचायतीत गैरव्यवहार ; थेट जिल्हाधिकाऱ्यांनाच चौकशीचे साकडे !

Shiradhon Gram Panchayat : शिराढोण ग्रामपंचायतीत गैरव्यवहार ; थेट जिल्हाधिकाऱ्यांनाच चौकशीचे साकडे !

नांदेड, सोशल वर्क
नांदेड| कंधार तालुक्यातील शिराढोण ग्रामपंचायतीच्या ग्रामविकास अधिकाऱ्यांकडून गैरव्यवहार झाल्याने जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनाच चौकशीसह दोषींविरुद्ध कारवाईचे साकडे घालण्यात आले त्यांची नुकतीच भेट घेऊन श्याम कपाळे व सहकांऱ्यानी याबाबत निवेदन दिले आहे. अधिक माहिती अशी की, ग्रामपंचायत कार्यालय, शिराढोण सन् २०२३ - २४ या आर्थिक वर्षांत घनकचरा व्यवस्थापनासाठी रु.तिन लाख रुपयांचे डस्ट बीन खरेदी केल्याची खोटी बिले दाखवून ग्रामपंचायतीच्या वतिने सदरची रक्कम ऑगस्ट २०२४ मध्ये स्थानिक ग्रामविकास अधिकारी भीमाशंकर मुंजाळ यांच्याच वैयक्तिक मालकीच्या सुजल एन्टरप्रायजेस ला जास्तीत जास्त प्रमाणात देण्यात आलेली असून प्रत्यक्षात गांवात कुठेही डस्ट बीन नसल्याचाही आरोप निवेदनातून करण्यात आलेला असून या निवेदनावर गजानन पांडागळे,श्याम कपाळे,लक्ष्मण बोंदकुले,माधव भुरे,राम पांडागळे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. ...
error: Content is protected !!