उस्माननगर, माणिक भिसे | ट्युशन साठी घराबाहेर पडलेल्या अल्पवयीन मुलीचा शोध उस्माननगर पोलिसांच्या पथकाने काही तासातच लावला. मुलीला सालापूर जिल्ह्यातील शिखर शिंगणापूर येथून ताब्यात घेऊन सुखरूपरीत्या तिच्या नातेवाईकांकडे सोपविण्यात आले. उस्माननगर पोलीस ठाण्यात ४ ऑगस्ट रोजी एका महिलेने तिची अल्पवयीन मुलगी ट्युशन साठी घराबाहेर पडली व संध्याकाळपर्यंत परत आली नसून तिचे अपहरण झाल्याची तक्रार दाखल केली होती.


उस्माननगर पोलिस पथकाची कामगिरी उस्माननगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय नीलपत्रेवार यांनी सदर महिला कडे अल्पवयीन मुली बाबत चौकशी केली असता तिच्याकडे मोबाईल असल्याबाबतची माहिती मिळाली. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी सायबर शाखेकडून मोवाईलचे लोकेशन घेतले, सदर मोबाईलचे लोकेशन सोलापूर येथे असल्याची माहिती प्राप्त झाली.


त्यानंतर नील पत्र वार यांनी तात्काळ पोलीस उपनिरीक्षक सूर्यवंशी व महिला हवालदार पल्लवी डोळे यांना सालापूरकडे रवाना केले. सदर अल्पवयीन मुलीस शिखर शिंगणापूर (ता. माळशिरस, जि. सोलापूर) येथून उस्मान नगर पोलीस ठाणे येथे आणून सुखरूप रित्या तिच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. या कामगिरी बद्दल जिल्हा पोलीस अधीक्षकांनी उस्माननगर पोलीस पथकाचे अभिनंदन केले आहे.




