नांदेड| मुखेड तालुक्यातील अंबुलगा (बु.) व परिसरात आज 25 ऑक्टोबर 2024 रोजी दुपारी 14:43 वा व 15:13 वा दोन वेळा भुगर्भातून आवाज येऊन सौम्य हादरे जाणवले असल्याची माहिती जिल्हा आपत्कालीन कार्यकेंद्राने दिली.
अधिकृतरित्या दिलेल्या वृत्तानुसार या भूकंपसदृश्य हादऱ्यांची तीव्रता रिक्टर स्केलवर अनुक्रमे 1.5 व 0.7 अशी नोंदविण्यात आलेली आहे.
भूकंपाचा केंद्रबिंदू मुखेड शहरापासून 12 किमी दूर दक्षिणपूर्व दिशेला असून या धक्क्यामुळे कुठलीही जीवित व वित्त हानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती जिल्हाप्रशासनाच्यावतीने देण्यात आली.