नांदेड| महाराष्ट्र राज्य पद्मशाली कर्मचारी संघटनेतर्फे दि. ७ जुलै २०२४ (रविवार) रोजी सकाळी १० वाजता, शुभारंभ मंगल कार्यालय, लेबर कॉलनी नांदेड येथे करियर मार्गदर्शन शिबिर, २१० गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, १८ नवनियुक्त, १२ सेवानिवृत्त, १० पदोन्नत – सेवानिवृत्त कर्मचारी बांधवांचा सत्कार कार्यक्रम उत्सवात संपन्न झाला.
सदरील कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून माननीय श्री श्रीधरराव सुंकुरवार गौरवाध्यक्ष अखिल भारतीय पद्मशाली संघम हैद्राबाद, स्वागताध्यक्ष श्री राजेश यन्नम माजी नगरसेवक महानगरपालिका नांदेड, विशेष अतिथी मा. श्री अशोकजी इंदापुरे निमंत्रक विशेष मागास प्रवर्ग महाराष्ट्र राज्य, मा.प्रा.श्री बालाजी कोंपलवार माजी उपप्राचार्य तथा वैधानिक विकास मंडळाचे सदस्य, प्रमुख उपस्थिती श्री प्रल्हादराव सुरकुटवार उपाध्यक्ष अ.भा. प. संघम हैद्राबाद,श्री प्रकाशभाऊ मारावार शिवसेना सहसंपर्क प्रमुख नांदेड, श्री गोविंदभाऊ कोकुलवार युवक संघटना मराठवाडा अध्यक्ष, श्री श्रीनिवास धावरशेट्टी अध्यक्ष ऑक्सफर्ड द ग्लोबल स्कूल नांदेड, श्री डॉ.गणेश अंकाम, निजमाबाद, श्री माधव गुरुपवार हॉटेल उद्योजक नांदेड, श्री नागेश पुट्टा (जालनेकर) प्रसिध्द उद्योजक नायगाव, श्री विजय बेतिवार जिल्हा कृषी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड, श्री विजय कुरुंदकर कार्यकारी अभियंता नांदेड, श्री अशोक श्रीमनवार, अध्यक्ष- मार्कंडेय नागरी सहकारी बँक नांदेड, श्री ईश्वर येमुल, अध्यक्ष – दि. टाऊन मार्केट सोसायटी नांदेड, सौ. कविता गड्डम पद्मशाली समाज संघटना महिला मराठवाडा अध्यक्ष, श्री नंदकिशोर अडकटलवार युवक जिल्हाध्यक्ष युनायटेड पद्मशाली संघम नांदेड, श्री नागनाथ गड्डम मा.नगरसेवक म. न. पा. नांदेड, डॉ.विजय बंडेवार, श्री मल्लेश बल्ला पद्मशाली समाज संघटना नांदेड (उत्तर) तालुकाध्यक्ष, श्री धनंजय गुम्मलवार, अध्यक्ष – जि.प.कर्मचारी संघटना (ओंकार) नांदेड,श्री शिवशंकर सिरमेवार, श्री संतोष कोंकलवार यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरूवात महर्षी मार्कंडेय ऋषीच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन व दीप प्रज्वलन करून करण्यात आले. सर्व मान्यवरांचे शाल, हार, मोमेंटो देऊन सत्कार करण्यात आला. यानंतर संघटनेचे अध्यक्ष नागभूषण दुर्गम यांनी प्रास्ताविक मांडले. प्रास्ताविकात संघटनेची स्थापना ५ जुलै २०१४ ला झाली. तेव्हा पासुन सतत १० वर्षा पासून संघटनेने गुणवंत विद्यार्थी सोहळा व महर्षी मार्कण्डेय दिनदर्शिका (१० हजार प्रती अगदी मोफत) या सह अनेक समजिक उपक्रमात सहभाग घेतला तसेच अनेक कर्मचारी बांधवांच्या स्मस्या सोडवल्या, विद्यार्थ्याना शैक्षणिक बाबतीत येणाऱ्या अडचणी सोडिण्यासाठी मदत केली.ग्रामीण भागातील विद्यार्थांना नांदेड मध्ये विद्यार्थी वसतिगृह असणे काळाची गरज असून सर्वांच्या सहकार्याने होणे आवशक असल्याचे दुर्गम यांनी सांगितले.
कार्यक्रमात अशोक इंदापुरे(सोलापूर ), प्रकाश मारावार, कार्यक्रमाचे अधक्ष श्रीधरराव सुंकरवार इ.मान्यवरांनी आपले विचार मांडले व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्र राज्य पद्मशाली कर्मचारी संघटनेतर्फे यावर्षीचा समाज भुषण पुरस्कार-२०२४ समाजासाठी, जनतेसाठी अहोरात्र काम करणारे, जलसम्राट लोकप्रिय आमदार माननीय कैलाससेठ किशनराव गोरंट्याल विधानसभा सदस्य जालना यांना देऊन गौरव करण्यात आला. करिअर मार्गदर्शक श्री रमेश दिकोंडवार (पुणे) व श्री सुरेश कटकमवार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
यानंतर इयत्ता १० वी, १२ वी ७०% पेक्षा जास्त गुण घेणारे विद्यार्थी, NEET, IIT, NIT प्रवेश पात्र,५ वी ८वी शिष्यवृत्ती धारक, जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश पात्र गुणवंत विद्यार्थी तसेच नवनियुक्त, पदोन्नत व सेवानिवृत्त कर्मचारी यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याच कार्यक्रमात स्वागत अध्यक्ष तथा नांदेड म.न.पा. चे लोकप्रिय मा.नगरसेवक राजुभाऊ यन्नम यांना वाढदवसानिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या. कार्यक्रमात समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी होत प्रचंड प्रतिसाद दिला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संघटनेचे शिवाजी अन्नमवार, संतोष गुंडेटवार, विजय वड्डेपल्ली, शंकरराव कुंटूरकर, गणेश भूसा, नरसिंग गुर्रम, नरसिमलू वंगावार, सूर्यकांत दासरवार,विजय चरपिलवार, नारायण अडबलवार, प्रा. विजय उपलंचवार, संतोष ताडेवार,नरसिंग जिडेवार, रामदास शेकापूरे, हिराप्रकश बोड्डावार, नागेश कैरमकोंडा, पुरशोत्तम तालकोकुलवार, राजेश दाचावार, धोंडीबा तेलेवार, सचिन रामदिनवार, संतोष गुम्मलवार, सत्यपाल मेका, नाथा गंगूलवार, श्याम चिलकेवार, राम चिलकेवार,विजय रामदिनवार, गणेश यल्लेवार, प्रकाश ताटकोंडवार , गजानन ताटकोंडलवार, श्रीनिवास जोरिगल्ला, योगेश दुर्गम,महेश गाजुला, भारत गट्टेवार आदींनी मेहनत घेतली.
अतिशय आनंदात व उत्साहात कार्यक्रम पार पडला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संघटनेचे उपाध्यक्ष शंकरराव कुंटूरकर व कार्याध्यक्ष शिवाजी अन्नमवार यांनी केले. आभार जिल्हाध्यक्ष विजय चरपिलवार यांनी मांडले. विद्यार्थी, पालक, नवनियुक्त, पदोन्नत, सेवानिवृत्त कर्मचारी व समाज बांधवांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला व देणगीदाराणी सढळ हताने मदत केल्याबद्दल तसेच महाराष्ट्र राज्य पद्मशाली कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी, कर्मचारी बांधव यांनी विशेष परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी केल्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार संघटनेचे अध्यक्ष नागभूषण दुर्गम यांनी आभार मानले.