पद्मशाली कर्मचारी संघटने कडून नांदेड येथे गुणवंत विद्यार्थी, नवनियुक्त, सेवानिवृत्त, पदोन्नत कर्मचारी यांचा सत्कार – NNL
नांदेड| महाराष्ट्र राज्य पद्मशाली कर्मचारी संघटनेतर्फे दि. ७ जुलै २०२४ (रविवार) रोजी सकाळी १० वाजता, शुभारंभ मंगल कार्यालय, लेबर कॉलनी नांदेड येथे करियर मार्गदर्शन शिबिर, २१० गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, १८ नवनियुक्त, १२ सेवानिवृत्त, १० पदोन्नत - सेवानिवृत्त कर्मचारी बांधवांचा सत्कार कार्यक्रम उत्सवात संपन्न झाला.
सदरील कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून माननीय श्री श्रीधरराव सुंकुरवार गौरवाध्यक्ष अखिल भारतीय पद्मशाली संघम हैद्राबाद, स्वागताध्यक्ष श्री राजेश यन्नम माजी नगरसेवक महानगरपालिका नांदेड, विशेष अतिथी मा. श्री अशोकजी इंदापुरे निमंत्रक विशेष मागास प्रवर्ग महाराष्ट्र राज्य, मा.प्रा.श्री बालाजी कोंपलवार माजी उपप्राचार्य तथा वैधानिक विकास मंडळाचे सदस्य, प्रमुख उपस्थिती श्री प्रल्हादराव सुरकुटवार उपाध्यक्ष अ.भा. प. संघम हैद्राबाद,श्री प्रकाशभाऊ मारावार शिवसेना सहसंपर्क प्रमुख नांदेड, श्...
