कळमनुरी | कळमनुरी विधानसभा मतदारसंघातील मराठा समाजाचे युवा नेतृत्व तथा मनोज जरांगे पाटील यांचे कट्टर समर्थक बाजीराव पाटील सवंडकर यांनी मनोज जरांगे पाटील यांनी आदेश दिल्यास कळमनुरी विधानसभा मतदारसंघातून विधानसभा निवडणूक पूर्ण ताकतीनिशी लढविण्याचा निर्धार पत्रकार परिषदेत माध्यमांशी संवाद साधताना व्यक्त केला


याविषयी अधिक माहिती देताना त्यांनी सांगितले की कळमनुरी विधानसभा मतदारसंघ हा अनेक समस्यांनी ग्रस्त असून नागरी सुविधांसह या मतदारसंघाचा विकासापासून कोसो दूर असा प्रवास राहिलेला आहे या मतदारसंघात सातत्याने भूमिपुत्रांवर इतर विधानसभा मतदारसंघातील उमेदवार देऊन या भागातील प्रतिभावान युवकांवर व राजकीय नेतृत्वावर अन्याय झाल्याची भावना त्यांनी बोलून दाखवितानाच सांगितले की या मतदारसंघातून सातत्याने मतदारसंघाबाहेर तील व्यक्ती आमदार म्हणून निवडून येत असल्यामुळे या मतदारसंघाच्या स्थानिक लोक व लोकसमुहांच्या भावनांचा अनादर झाल्याचे सातत्याने बघायला इथल्या जनतेला अनुभवायला आलेला आहे


मराठा समाजाच्याच नव्हे तर मतदार संघातील शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या व शोषितांच्या प्रश्नांसाठी सातत्याने रस्त्यावर उतरून लढाई करणारा कार्यकर्ता अशी सर्वश्रुत ओळख बाजीराव पाटील सवंडकर यांनी आपल्या कार्यशैलीतून निर्माण केलेली आहे असा जनाधार असलेला कार्यकर्ता जर आमदार पदी निवडून गेला तर निश्चितच सामान्य जनतेचा मोठा फायदा या निमित्ताने होणार आहे अशी भावना बाजीराव पाटील समर्थकांनी यावेळी बोलून दाखविली आहे ..

बाजीराव पाटील सवंडकर यांनी मनोज जरांगे पाटील यांनी उभारलेल्या मराठ्यांच्या आरक्षण लढ्यात विलक्षण कामगिरी करताना कळमनुरी विधानसभा मतदारसंघातच नव्हे तर कळमनुरी सह हिंगोली जिल्ह्यातील गावंन गाव स्वतःच्या खर्चाने भेटी दिले आहेत ते त्याभागात फिरले आहेत तेथील समस्या व प्रश्न जाणून घेतल्या आहेत मतदारसंघातील हजारो युवकांना विविध माध्यमातून त्यांनी सहकार्य केलेले आहे व त्यांच्या उज्वल भविष्यासाठी सातत्याने प्रयत्न करणार आहे एक युवा मराठा सेवक म्हणून त्यांनी आपली ओळख निर्माण केली आहे

तरी सर्व समाज स्तरातून पाठिंबा असणारा व सर्व आघाड्यावर सशक्त असे काम असलेला एक युवा कार्यकर्ता अशी छबी असलेल्या बाजीराव पाटील सवंडकर यांना मनोज जरांगे पाटलांनी आदेश दिल्यास संपूर्ण ताकतीने आपण कळमनुरी विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढू व ती निवडणूक जिंकून आणू असा दृढ विश्वास त्यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला