Kalmanuri Assembly ; कळमनुरी विधानसभा संधी दिल्यास पूर्ण ताकतीने लढविणार मराठा सेवक बाजीराव पाटील सवंडकर – NNL
कळमनुरी | कळमनुरी विधानसभा मतदारसंघातील मराठा समाजाचे युवा नेतृत्व तथा मनोज जरांगे पाटील यांचे कट्टर समर्थक बाजीराव पाटील सवंडकर यांनी मनोज जरांगे पाटील यांनी आदेश दिल्यास कळमनुरी विधानसभा मतदारसंघातून विधानसभा निवडणूक पूर्ण ताकतीनिशी लढविण्याचा निर्धार पत्रकार परिषदेत माध्यमांशी संवाद साधताना व्यक्त केला
याविषयी अधिक माहिती देताना त्यांनी सांगितले की कळमनुरी विधानसभा मतदारसंघ हा अनेक समस्यांनी ग्रस्त असून नागरी सुविधांसह या मतदारसंघाचा विकासापासून कोसो दूर असा प्रवास राहिलेला आहे या मतदारसंघात सातत्याने भूमिपुत्रांवर इतर विधानसभा मतदारसंघातील उमेदवार देऊन या भागातील प्रतिभावान युवकांवर व राजकीय नेतृत्वावर अन्याय झाल्याची भावना त्यांनी बोलून दाखवितानाच सांगितले की या मतदारसंघातून सातत्याने मतदारसंघाबाहेर तील व्यक्ती आमदार म्हणून निवडून येत असल्यामुळे या मतदारसंघाच्या स्थानिक लोक व लोकसम...
