HomeनांदेडDr. Ajit Gopchde : खा.डॉ.अजित गोपछडे यांनी रुग्णाच्या यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी...

Dr. Ajit Gopchde : खा.डॉ.अजित गोपछडे यांनी रुग्णाच्या यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी पंतप्रधान मदत निधीतून मिळवून दिले 3 लाख रुपयांचे अर्थसाह्य -NNL

नांदेड| खानापूर ता.देगलूर येथील शिवानंद मारोती परबते या 29 वर्षीय युवकाच्या यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी पंतप्रधान मदत निधीतून 3 लाख रुपयांचे अर्थसाह्य मंजूर झाले असून शिवानंद परबते या रुग्णाला आर्थिक मदत मिळावी यासाठी खासदार डॉ. अजित गोपछडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्राद्वारे विनंती केली होती.

शिवानंद मारोती परबते हा यकृताच्या गंभीर आजाराने पिडीत असून त्याच्यावर पुणे येथील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्याच्यावर यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. त्यासाठी डॉक्टरांनी 25 लाख रुपये खर्च अपेक्षित असल्याचे सांगितले होते. रुग्णाची आर्थिक स्थिती अत्यंत बिकट असून शस्त्रक्रियेच्या खर्चाचे ओझे त्याच्या कुटुंबियांना पेलवणे अशक्य आहे. त्याच्या कुटुंबियांना तात्काळ खा.डॉ.अजित गोपछडे यांच्याशी संपर्क साधून परिस्थिती कथन केली.

ही बाब लक्षात येताच खा.डॉ.अजित गोपछडे यांनी तात्काळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शिवानंद परबते या रुग्णाच्या यकृत प्रत्यारोपण श्शस्त्रक्रियेसाठी अर्थसाह्य देण्याची विनंती एका पत्राद्वारे केली असता पंतप्रधानांनी त्यांच्या पत्राची दखल घेऊन त्यांच्या निधीतून 3 लाख रुपयांचे अर्थसाह्य मंजूर केले. शिवानंदच्या मदतीसाठी खा.डॉ.गोपछडे धावून आल्याने त्याच्या नातेवाईकांनी खा.अजित गोपछडे यांचे आभार मानले आहेत. याबद्दल खा.डॉ.अजित गोपछडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे धन्यवाद मानले.

 

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments