बदलत्या जीवन व्यवस्थेत खेडोपाडी,वाडीतांड्यावरच ही सोशल मिडिया,फेसबुक,व्हॉटसअप , रिल्सने आपले जीवन कोंडून टाकले आहे. अशा आत्ममग्न व्यवस्थेत मनाला निखळ आनंद आणि जीवनाचा तणाव दूर व्हावा यासाठी आपण प्रयत्नशील असतो. धावपळीच्या काळात माळेगावच्या खंडोबारायाची यात्रा ग्रामीण जीवनाचे दर्शन घडवविते. हा आनंददायी मेळा मनसोक्त निखळ मौज मस्ती घडविणारा आहे.


मराठवाड्याचे भूमिपुत्र लोकनेते स्व विलासराव देशमुख यांचे कुलदैवत खंडोबा .त्यांच्याच राजाश्रयामुळे ही यात्रा राज्याच्या नकाशावर आली. दिनांक १८ डिसेंबर पासून यात्रेला देवस्वारी व पालखी पुजनाने प्रारंभ होईल, दिनांक १९ डिसेंबर पशु, अश्व, श्वान, कुक्कुट प्रदर्शन व विविध स्पर्धाचे उद्घाटन, दिनांक २० डिसेंबर – कृषिनिष्ठ शेतक-यांचा सत्कार (दुपारी ३ वाजता) दिनांक २२ तारखेला दुपारी एक वाजता लावणी महोत्सव२३ डिसेंबर कला महोत्सवाने समारोप होईल. पण पुढे पंधरा -वीस दिवस यात्रेतील खरेदी व्यवहार जोरात चालतात मराठवाड्यातील सर्वात मोठी यात्रा असून, ग्रामीण जीवनदर्शन घडविते.

धार्मिक महत्वा सोबतच सामाजिक वैविधल्याचं आगळ वेगळ वैशिष्ठे जपणारी माळेगावची यात्रा आहे. यात्रेचा इतिहास अनेक शतकाचा बदलत्या काळानुसार यात्रेला सोशल टच मिळाला. वैदू, होलार, मसनजोगी, वडर, कैकाडी, नाथजोगी, घीसडी, ताबकारी, राईदर, तुटबुडकेवले, डबेवाले, डोंबारी, भोई, नाथजोगी गारुडी, अस्वालवले, अशा असंख्य भटक्या जाती या माळेगावात येतात. हा खंडोबारायाच्या दरबारात जात, पक्ष ,धर्म, आशा कोणत्याही भिंती कधीच उभ्या राहिल्या नाहीत. भटक्यांच्या.. नाहिरे वाल्यांचा …गणगोत मेळा या यात्रेत भरतो… त्याची सोयरिक त्यांच्या कौटूबिक… कलहाची सोडवणूक याच खंडोबा रायाच्या दरबारात होते….


एक रुपया पाउंड.. दिलाय आंबेच्या नावाच..असे सांगणारे भुते पूर्वी माळेगाव झाल्यानंतर गावोगावी जाऊन जागरण व मनोरंजन करायचे पण आता ते कालौघात नामशेष होताहेत. तुरळक असणारे भुते आजही यात्रेत न चुकताना येतात. संख्यातशी कमीच.. भोप्या.. वासुदेव यांची पारंपारिक कला.. याच यात्रेत पहायाला अनुभवायला मिळते. उत्तर भारतातून येणारी उच्च प्रतीची घोडे त्यासाठीचे साज, उंट.. गाढवाचा बाजार फक्त माळेगावातच भरतो. महागड्या चार चाकी गड्याची दौलत घोड्याच्या स्वारीला कधीच माघे टाकू शकत नाही.

घोड्याची गावातून मारलेली रपेट त्या घोडे स्वाराच्या दिमातीचा बाज दर्शिवतें. आजच्या काळातही अश्व शौकीन खूप आहेत बाहेरील राज्यातले खरेदीदार येता.आज येतील अश्व बाजार देशपातळीवर जावा अशी माजी मुख्यमंत्री स्व विलासराव देशमुख यांची इच्छा होती पण सध्याची परिस्थिती कोणीच याजडे लक्ष देत नाहीत. आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर हे या यात्रेच्या वैभवासाठी गेल्या ३० -३२ वर्षा पासून प्रयत्न करताहेत अनेक कामे त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री स्व.विलासराव देशमुख व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडून निधी उपलब्ध करून घेत या भागात केली आहेत.
सारंगाखेड्यनंतर राज्यातला सगळ्यात मोठा घोडे बाजार येथेच भरतो. यात्रा तधी हवसे – गावसे …नेवसे यांची रसिक मनाच्या माणसाची कलाकाराची.. खरेदीदाराची ही यात्रा होय. जेथे विकत नाही असा माल जत्रेत खापविणाऱ्या चलाख व्यापाऱ्याची सुद्धा ही यात्रा आहे. हिजड्याच.. माळेगाव.. उचल्याच माळेगाव म्हणतात ते काही खोटे नाही. हरिभाऊ अन्विकर यांचा तमाशा फड यायचा आता कालौघात हा फड इतिहास जमा झालाय रघुवी, खेडकर, भीमा भीक…अशा अनेक तमाशा फडाला वर्षानुवर्ष.. पिढ्यान पिढ्या बळ देणारे ही यात्रा.. आजही तामाशगिराचा सन्मान करते आहे. पण तमाशा आता लयास जात आहेत सहा सात तमाशा मंडळ दरवर्षी यात्रेत येतात पण प्रेक्षकांचा होणार त्रास कलावंतांना खूपच क्लेशदायक असतो.
मराठवाड्याचा भूमिपुत्र विलासराव देशमुख यांचे आराध्य दैवत त्यांचे वडील दगडोजीराव देशमुख यात्रेला स्वतः यायचे शेवटपर्यंत रहायचे विलासरावामुळे यात्रेला राजाश्रय मिळाला. आ.प्रताप पाटील चिखलीकर यांनी यात्रेच्या विकासासाठी घेतलेले व घेत असलेले प्रयत्न यात्रेच लौकिक वाढवण्यास सहाय्य ठरले. माजी मंत्री गंगाधरराव कुंटूरकर, माजी आ.बापूसाहेब गोरठेकर, माजी उपाध्यक्ष आ.प्रतापराव पाटील चिखलीकर, माजी सभापती हरिहरराव भोसीकर यांनी जि.प.मध्ये असताना यात्रा विकासासाठी घेतलेले परिश्रम निश्चितच यात्रेच्या लौकीकात भर घालणारे होते. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिलीप पाटील बेटमोगरेकर यांनी यात्रेत लावणी महोत्सव सुरु केला व भरभराटीत भर घातली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्या टर्म निधी दिला.
कंधार पं.स.चे तत्कालीन सभापाती व्यंकटराव मुकदम यांनी सर्व तमाश कलावंतासाठी एक व्यासपीठ तयार केले तो कलामहोत्सव गेली ४३ वर्षा।पासून अविरतपणे सुरू आहे. त्यासाठी तत्कालीन कॅफो अनिल मोरे व बीडीओ शिंदे यांचे सहकार्य लाभले. लालमातीत कुस्त्या लालकंधारी, देवणी वाळू असे पशु प्रदर्शन, कुकुट, श्वान,अश्व प्रदर्शन हे यात्रेचे आणखी एक वैशिष्ट्ये शिवाय घरगुती वस्तू खरेदीचे मोठे मार्केट माळेगाव बनले आहे. जे कोठेच मिळेना ते माळेगावात मिळते.
यळकोट… यळकोट जयमल्हार म्हणत बेलभांडारा, खारीक – खोबऱ्याची .…उधळण हळदीच्या….. श्रद्धेत नाहून निघणारे लाखो भक्त यात्रेत खंडोबा चरणी माथा टेकविण्यासाठी येतात ….म्हाताऱ्याचा आधार वेळूच्या काठीचा… घोंगडी.. पितळी भांडी.. माशांचे जाळ, तितर पकडण्याचे डफ.. गरिबांचे जुने कपड्यांचे मॉल. अशा असंख्ये वस्तू येथे मिळतात. तसेच यंदा बक्षिसात वाढ झाली असून, जी. प. विभागाची पूर्व तयारी करते. तरीही यात्रेकरूंसाठी सुविधेच्या कमतरता भासतात तरीही पंधरा -वीस त्या पेक्षाही जास्त दिवस यात्रा चालते. कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असते.
माळेगावची यात्रा मराठवाड्यातच नव्हे तर लगतच्या आंध्र,कर्नाटक राज्यातही प्रसिद्ध आहे. अस्सल ग्रामीण जीवनाचे दर्शन घडवणारी यात्रा माणसाला ताण तणावातून मुक्त करत निखळ आनंद देते. उंच आकाश पाळणे, मौत का कुआ पन्ना लाल गाढव ..सर्कस…जादूगिरी… स्मरणात राहणाऱ्या असतात आनंद देणारी ही यात्रा आह ..लावणी …तामशाफड..आणि पन्नासके तींन गाणे…. यांचे शौकीन.. माळेगावात गर्दी करतात. असा कितीतरी मनोरजन देणाऱ्या आणि ताण तणाव मुक्तीचा हा मेळा एक निखळ.. मनसोक्त… हात चलाखी चा दीर्घकाळ आनंद देते…फेसबुक…व्हाट्सअप इस्टाग्राम, रिल्स सोशल मिडिया च्या जमान्यात आत्ममग्न माणसाला तणावमुक्त आणि ग्रामीण समाजाचे दर्शन माळेगाव यात्रा घडविते…या यात्रेची जपणूक सर्वांनी मिळून करायला हवी चला तर मग एकदा माळेगाव यात्रेला जाऊ या !
लेखक…हरिहर धुतमल, जेष्ठ पत्रकार लोहा, जी.नांदेड.

