नवीन नांदेड l सार्वजनिक शिवजन्मोत्सव समिती 2025 निमित्ताने नांदेड केसरी भव्य कुस्ती दंगल 19 फेब्रुवारी रोजी लुटे मामा चौक जुना कौठा नांदेड येथे आयोजीत करण्यात आलेल्या कुस्ती दंगल मध्ये सात लाख रूपयाची रोख पारितोषिक बक्षीस देण्यात आली असून अनुक्रमे दोन पैलवान विजयी झालेल्या माळेगाव केसरी अच्युत टरके व दिपक वडजकर यांना प्रत्येकी 51 हजार रुपये किलो चांदीच्या गदा देण्यात आली असून उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आली असून या कुस्ती दंगल मध्ये चार राज्यांतील पाचशे पैलवानाचा कुस्त्या लावण्यात आल्याची माहिती आयोजक रामेश्वर काळे पाटील यांनी दिली.


दरवर्षी प्रमाणे याही वर्षी सार्वजनिक शिवजन्मोत्सव निमित्ताने कुस्ती दंगल आयोजित करण्यात आली असून जवळपास सात लक्ष रूपये रोख रक्कम पारितोषिक देण्यात येणार आहेत, या कुस्ती दंगल मध्ये महाराष्ट्र राज्यासह दिल्ली,हरियाणा, पंजाब, राज्यातील विविध जिल्ह्यांतील नामवंत पहेलवान सहभागी झाले होते.

या कुस्ती दंगल उद्घाटक संत बाबा बलविंदरसिंघजी तर प्रमुख पाहुणे म्हणून नांदेड लोकसभा मतदारसंघ संघाचे खा.रविंद्र चव्हाण , आ.प्रताप पाटील चिखलीकर,आ. आनंदराव पाटील बोढारकर,माजी आ. मोहनराव हंबर्डे, शिवसेना नांदेड दक्षिण जिल्हा प्रमुख विनय पाटील गिरडे,यांच्या सह प्रमुख उपस्थिती तिरूपती पाटील कोढेंकर, माजी राजु गोरे, पांडुरंग काकडे,माजी जिल्हा परिषद सदस्य गंगाप्रसाद काकडे,नंदु पाटील वैध, पंजाबराव पाटील काळे,धिरज यादव,रवि किरण डोईफोडे,सरदार जगतसिंग गडीवाले, दिलीपसिंग गडीवाले, संजय काकडे, यांच्यासह पोलिस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर,सहाय्यक पोलीस निरीक्षक वाटाणे, पोलीस निरीक्षक अंबुलगे, यांच्या सह मान्यवरांच्यी उपस्थिती होती, या कुस्ती कार्यक्रमाचे निवेदक पै.भालचंद्र रणशुर जवळ बाजार यांनी तर सुत्रसंचलन भरत काकडे यांनी केले.

या कुस्ती दंगल मध्ये अच्युत टरके 51,000 व चांदीची गदा,दिपक वडजकर चांदीची गदा 51,000 , परमेश्वर जगताप 31000 व मानाची ट्राफी , विजय वारा वाशीम,अबु चाऊस , जयवंत गिते परभणी यांना प्रत्येकी 31,000 व मानाची ट्राफी मान्यवरांच्या उपस्थितीती मध्ये देण्यात आली.हि कुस्ती दंगल यशस्वीतेसाठी मित्र परिवार जुना कौठा नांदेड परिश्रम घेतले.दुपारी सुरू झालेली कुस्ती दंगल रात्री उशिरा पर्यंत चालली ,हालगी वादक म्हणून प्रसिद्ध असलेल्या बालाजी जाधव व संच यांनी वाजवून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.
