नांदेड। मागील अनेक वर्षापासून सातत्याने देण्यात येणार्या महात्मा बसवेश्वर समाजरत्न पुरस्कार महंत गोपाळगिरी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज सह्याद्रीरत्न पुरस्कार विवेक देशपांडे यांना तर डॉ.शंकररावजी चव्हाण गुरूरत्न पुरस्काराच्या श्रीमती गोदावरीताई मुंडे मानकरी ठरल्या असून लवकरच मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार प्रदान सोहळा संपन्न होणार असल्याची माहिती मुख्य संयोजक तथा मुख्य संपादक रूपेश पाडमुख यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
मीमांसा फाऊंडेशन, दै.समीक्षा, मंथन क्रिएटिव्ह ग्रुप, पत्रकार प्रेस परिषद व महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्यावतीने दरवर्षी वेगवेळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्यांचा विविध पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येतो. यंदाचे हे 16 वे वर्ष आहे. त्यात महात्मा बसवेश्वर समाजरत्न पुरस्कार हदगांव तालुक्यातील दत्तबर्डी संस्थानचे महंत गोपाळगिरी गुरूराम गिरी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज सह्याद्रीरत्न पुरस्कार कंस्ट्रक्शनच्या माध्यमातून आपल्या नावाचा ठसा देशभर उमटविणारे रुद्राणी कंस्ट्रक्शनचे संचालक विवेक देशपांडे, विरशिरोमणी महाराणा प्रताप प्रेरणादायी पुरस्कार धर्माचे रक्षणासह प्रबोधन करून जागृती करणार्या जालना येथील साध्वी धर्मसिंहनी गायत्री दीदी,
महात्मा ज्योतीबा फुले एकात्मता पुरस्कार वैद्यकीय क्षेत्रात सेवा देत गरीब रूग्णांना मदत करणारे नांदेडचे डॉ.मृत्यूंजय महेंद्रकर, राजश्री शाहू महाराज सामाजीक न्याय पुरस्कार राजकीयच नव्हे तर समाजाच्या प्रत्येक घटकासाठी अहोरात्र परिश्रम घेणार्या छत्रपती संभाजी नगरच्या सौ.लक्ष्मी ताई नरहिरे, धरती आबा बिरसा मुंडा संघर्षरत्न पुरस्कार वैद्यकीय क्षेत्रात उच्च शिक्षण घेऊन गरजवंत रूग्णांसाठी सेवेसह सामाजीक कार्यात अग्रेसर असणारे लातूरचे डॉ. गजानन हलकंचे,भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार कोणतेही पद नसताना लाखोचा विकास निधी आणून जनसेवा करत त्यांच्या सुख दुखात हिरहिरीने सहभागी होणारे हदगाव तालुक्यातील सामान्य कुटूंबातील नामवंत व्यक्तीमत्व बाबुराव कदम,
मौलाना अब्दुल कलाम आझाद ऐक्य सेवा पुरस्कार पिडीत, गरीब आणि डॉक्टरांचे बिल भरण्यास असमर्थ असणार्या रूग्णांची सेवा करत त्यांच्यात साहस निर्माण करणारे मुंबईचे आरोग्यसेवक धनंजय पवार, राष्ट्रसंत गाडगेबाबा प्रबोधनरत्न पुरस्कार लातूरचे नव्हे परिसरात सातत्याने मार्गदर्शन करून रूग्णांच्या मानसीकतेला योग्य दिशा दाखवत नवसंजीवनी देण्याचे प्रयत्न करणारे डॉ.सचिन जाधव, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे साहित्य सेवक पुरस्कार मुंबई येथे पत्रकारितासह विविध क्षेत्रात आपली कामगिरी दाखविणारे दत्ता खंदारे तसेच डॉ. शंकररावजी चव्हाण गुरूरत्न पुरस्कार मागील अनेक वर्षापासून गवळण व भजनाच्या माध्यमातून सांस्कृतीक चळवळ कायम ठेवणार्या गंगाखेडच्या श्रीमती गोदावरीताई मुंडे यांना जाहिर करण्यात आला आहे.
तरी सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन मंथन क्रिएटिव्ह गु्रप व लातुरचे संपादक रामेश्वर धुमाळ, प्रदेश प्रभारी अरविंद जाधव, मराठवाडा अध्यक्ष सखाराम कुलकर्णी, सहसंपादक ज्ञानेश्वर पवार, ज्येष्ट पत्रकार सुनिल कुलकर्णी, रमेश तिवारी, सौ. उज्वला दर्डा, सौ. जयश्री राठोड, सौ. सविता गबाळे, श्रीमती उषा हडोळतीकर, सौ. अरूणा पूरी, सौ.प्रणीता भरणे, शिवहरी गाढे तथा संपादक रूपेश पाडमुख यांनी केले आहे.