नांदेड| डॉ.एकबाल उर्दू माॅडल हायस्कूल अर्धापूरमध्ये बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम- २००९ नुसार मुलभूत सुविधांचा अभाव असल्याने या शाळेची चौकशी करुन मान्यता रद्द करण्याची तक्रार प्राप्त होताच महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अव्वर सचिव प्र.धा.अंधारे यांनी या प्रकरणात तातडीने कार्यवाहीचे आदेश नांदेड जिल्हा परिषदेतील माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी यांना दिले असल्याची खात्रीलायक माहिती प्राप्त झाली आहे.



सविस्तर वृत्त असे की, डॉ.एकबाल उर्दू माॅडल हायस्कूल,अर्धापूर या शाळेत बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिनियम-२००९ नुसार मुलभूत सुविधा असणे अत्यावश्यक असतांनाही मान्यतेपासूनच अनाधिकृत जागेत असणाऱ्या या शाळेत अनेक मूलभूत व प्राथमिक सुविधांचा अभाव होता याबाबत सविस्तर तक्रार महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोग यांच्याकडे पुराव्यानिशी मोहम्मद जाफर शेख गुलाम महेमुद,नांदेड यांनी दि.२३.०१.२५ रोजी केलेली होती.त्यानुषंगानेच आयोगाचे अव्वर सचिवांनी दिनांक २८.०१.२०२५ रोजी एका आदेशानुसार या प्रकरणात कार्यवाहीचे आदेश दिले आहेत.


दरम्यान या प्रकरणात आयोगाकडून आदेश प्राप्तीनंतरही नांदेड जिल्हा परिषद माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी यांच्याकडून संबंधित दोषींविरुद्ध कारवाई दूरच अध्याप चौकशीलाही सुरुवात केली नसल्याने त्यांच्यावरही दोषींसह त्यांना पाठीशी घातल्याने कारवाई होण्याचे संकेत प्राप्त झाले आहेत.




