हदगाव, शेख चांदपाशा| दरवर्षीप्रमाणे याही वर्षी माजी खासदार सुभाष वानखेडे यांच्या वतीने श्रावण महिन्यातील दिनांक १८ ऑगस्ट सोमवार रोजी केदारनाथ येथे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. याचा लाभ पंचक्रोशीतील व दर्शनार्थी भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केलं आहे.


महाप्रसाद सोहळ्याला भाविकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती अपेक्षित असून, सकाळी माजी खासदार सुभाष वानखेडे यांच्या हस्ते केदारनाथाचा अभिषेक करण्यात येईल. त्यानंतर महाप्रसादाला सुरुवात होणार आहे. माजी खासदार सुभाष वानखेडे हे महादेवाचे मोठे भक्त असून, त्यांच्या कार्यकाळात केदारनाथ देवस्थान परिसरातील रस्ते व इतर सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात त्यांनी पुढाकार घेतला होता. त्यामुळे भाविकांना दर्शनासाठी अडचणी येऊ नयेत याची त्यांनी नेहमी काळजी घेतली आहे.


राजकीय कार्यक्रम असो वा धार्मिक, माजी खासदार वानखेडे यांच्या प्रत्येक उपक्रमाला भाविक व जनतेची मोठी गर्दी दिसून येते. श्रावण महिन्यात दरवर्षी होत असलेला हा महाप्रसाद सोहळा आता एक परंपरा बनला असून, भाविक भक्तांनी या आयोजनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.



