लोहा| निर्धार केला आणि त्याला कृतीची जोड झाली तर कोणतेही काम अशक्य नसते. लोहा शहरातील इंदिरानगर भागाचे नवनिर्वाचित नगरसेवक तुकाराम दाढेल व इरबाजी पवार याच्या टीमने पुढाकार घेतला आणि परिसर स्वच्छता मोहीमेला सुरूवात केली त्यात या भागातील तरुण व नागरिकांने सहभाग घेतला. या मोहिमेचे शहरात जोरदार स्वागत करण्यात आले.


पाहिले नगराध्यक्ष माणिकराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त आमदार प्रतापराव पाटील_चिखलीकर यांच्या आदेशानुसार प्रदेश सरचिटणीस युवा नेते प्रवीण चिखलीकर, युवा नेते सचिन पाटीलचिखलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली नवनिर्वाचित नगराध्यक्ष शरद पाटीलपवार यांनी केलेक्या अहवानाला प्रतिसाद देत इंदिरानगर येथे स्वच्छता मोहीम लोकचळवळ बनते आहे. मंगळवारी १३ जानेवारी रोजी या भागांत नवनिर्वाचित नगराध्यक्ष शरद पवार, उपनगराध्यक्ष करीम शेख याच्या नेतृत्वाखाली नगरसेवक तुकाराम दाढेल, इरबाजी पवार यांनी पुढाकार घेऊन या भागात स्वच्छता मोहिमेला सुरुवात केली त्यांना या भागांतील रहिवाशांची साथ मिळते आहे.

मारोतराव दाढेल, माधवराव दाढेल,बालाजी इरबा पवार,बालाजी जाधव,अनवर शेख, लक्ष्मण पवार,राहुल भिसे,सकाराम दाढेल,यंकटी मामा लिंबोळे,नंदू दाढेल, संदीप कंधारे,राजू दाढेल,माधव लोंढे, सूर्यकांत दाढेल,गोविंद पवा,नागेश लोंढे, राजू बंजलवाड,साईनाथ लिंबोळे, विश्वास मोरे,चंद्रकांत दाढेल,सतीश कंधारे,ओमकार पवार,कल्याण दाढेल, एकिन देशमुख, ऋषिकेश हरगावकर, .शकुंतलाबाई दाढेल, .विमलबाई कंधारे, रुपाली ताई दाढेल,सुंदरबाई डिकळे आदी सह मोठ्या संख्येने माहिला पुरुष यात सहभागी झाले होते. नगरसेवक तुकाराम दाढेल यांनी स्वतः दोन दिवसांपूर्वी या भागात तुंबलेल्या गटाराची स्वछता केली .पदव्युत्तर शिक्षण घेतलेले नगरसेवक दाढेल यांच्या कामामुळे लोकांनी भरघोस मतांनी विजयी केले त्याचे सार्थक होतात दिसत आहे असा प्रतिक्रिया उमटल्या आहेत.



पाहिले नगराध्यक्ष माणिकराव पाटील यांची जयंती साजरी
लोह्याचे पहिले नगराध्यक्ष माणिकराव पाटील पवार यांच्या जयंतीनिमित्त नगर पालिका सभागृहात त्यांना अभिवादन करण्यात आले. नगराध्यक्ष शरद पवार, उपनगराध्यक्ष करीम शेख माजी उपनगराध्यक्ष केशवराव मुकदम, मुख्याधिकारी श्रीकांत लाळगे हरिभाऊ चव्हाण अविनाश पवार, केतन खिल्लारे , गणेश बगाडे ,यासह नगरसेवक कर्मचारी उपस्थिती होते. सकाळीच श्रीराम नगरात नगराध्यक्ष शरद पवार नगरसेवक हरिभाऊ चव्हाण अविनाश पवार, रावसाहेब मंजलवाड राजेश बोडके यांनी स्वच्छता मोहीम हाती घेतली तेथे नगराध्यक्ष यांनी श्रमदान केले.


