हिमायतनगर| महाराष्ट्र शासन ग्राम विकास व पंचायत राज विभाग राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण महा आवास अभियान 2024-25 अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा -2 या थेट प्रक्षेपण कार्यक्रमाचे आयोजन हिमायतनगर पंचायत समिती कार्यालयात करण्यात आले होते.


तालुक्यात 2024-25 अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा -2 मध्ये एकूण 6258 लाभार्थ्यांना मंजुरी मिळाली आहे .महाराष्ट्र शासन ग्राम विकास व पंचायत राज विभाग राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण महा आवास अभियान 2024-25 अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा -2 या थेट प्रक्षेपण कार्यक्रमाचे आयोजन गटविकास अधिकारी प्रल्हाद जाधव यांच्या अध्यक्षतेखाली वंसतराव नाईक सभागृहात २२ फेब्रुवारी सायंकाळी 4:35 मि.वेळेत आयोजित करण्यात आले होते.


तालुक्यातील 5352 प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेतील मंजूर लाभार्थ्यांच्या खात्यात 15 हजार रुपयांचा पहिला हप्त्याचे वितरण शासनाच्या थेट प्रक्षेपण कार्यक्रमातून केंद्रीय मंत्री,मुख्यमंत्री व मान्यवरांच्या हस्ते होणार असल्याचे दाखविण्यात आले आहे. तर उर्वरित 900 लाभार्थ्यांच्या काही तृटी निर्माण झाल्या असून त्या पुर्ण झाल्यानंतर उर्वरित लाभार्थ्यांना देखील काही दिवसांत पहिला हप्ता जमा करण्यात येणार असल्याचे गटविकास अधिकारी प्रल्हाद जाधव यांनी सांगितले आहे.


ग्रामीण भागातील घरकुल लाभार्थ्यांनी पहिला हप्ता जमा झाल्यानंतर काम सुरू करून प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन गटविकास अधिकारी यांनी केले आहे.यावेळी पं.स.चे पि.डी.गायकवाड, स्थापत्य अभियंता विशाल पवार, स्वप्निल भद्रे,गृहनिर्माण अभियंता सुनील जोशी, वसंत सोनटक्के, गोविंद शिरगिरे,वैभव नाईक ,पतंगे,भौरे, पंचायत समिती कर्मचारी , ग्रामपंचायत अधिकारी तसेच गजानन तुप्तेवार, बालाजी राठोड, विजय वळसे, आशिष सकवान,राम सुर्यवंशी, सरपंच मारोती वाडेकर, संजय सुर्यवंशी, सोपान बोंपीलवार,संतोष पाटील कदम ,ज्ञानेश्वर पुटेवाड , आदींची उपस्थिती होती.



