नांदेड। सोनखेड पोलिसांनी विधीसंघर्ष बालकास एक गावठी कटटा व एक जिवंत काडतुससह 40,400/- रुपयांच्या मुद्देमालास अटक केली आहे.
अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक नांदेड यांनी अवैध शस्त्र बाळगणारे व्यक्ती विरुद्ध कारवाई करणे बाबत सर्व पोस्टे प्रभारी अधीकारी यांना आदेश दिले होते. त्या अनुषंगाने दिनांक 06.11.2024 रोजी सोनखेड पोलीस पेट्रोलींग करीत असतांना गोपनिय माहीती मिळाली की, एक व्यक्ती आपले ताब्यात एक गावठी कटटा व एक जिवंत काडतुस सोबत बाळगुन नांदेड ते उस्माननगर जाणारे रोडवर ढाकणी पाटी ता लोहा येथे थांबला.
त्या ठिकाणी जावुन सदर व्यक्तीस ताब्यात घेवुन चौकशी केली असता तो विधीसंघर्ष बालक असल्याचे आढळून आले. त्याचे ताब्यातुन वरील हत्यार मिळुन आले असून, त्याने मा. जिल्हाधीकारी नांदेड यांचे शस्त्र बंदी आदेशाचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे सोनखेड पोलीस ठाण्यात गु.र.नं. 201/2024 कलम 3/25 भाहका व कलम 135 मपोका अनुसार सपोनि पांडुरंग व्यंकटराव माने, पोस्टे सोनखेड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.