Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

March 12, 2026

heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी

March 12, 2026

Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

March 12, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर
  • heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी
  • Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी
  • कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश
  • अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड
  • पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे
  • Nanded-Latur ; नांदेड-लातूर थेट रेल्वे मार्गाच्या पुढील कार्यवाहीला लवकरच गती! खा. अशोकराव चव्हाण यांची माहिती
  • जागतिक वारसा ठरलेल्या मराठा किल्ल्यांच्या जतनासाठी खा. अशोकराव चव्हाण यांची कृती आराखड्याची मागणी
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Mahabhu Sampadan Portal : नांदेड जिल्ह्यात ‘महाभूसंपादन पोर्टल’चा शुभारंभ
नांदेड कृषी January 1, 2026

Mahabhu Sampadan Portal : नांदेड जिल्ह्यात ‘महाभूसंपादन पोर्टल’चा शुभारंभ

‘महाभूसंपादन पोर्टल’मधून ऑनलाईन पद्धतीने होणार भूसंपादन प्रक्रिया
NNL TeamBy NNL TeamJanuary 1, 20260
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड| महाराष्ट्र राज्यामध्ये विविध सार्वजनिक प्रकल्पांसाठी मोठ्या प्रमाणावर खाजगी जमिनीचे भूसंपादन करण्यात येते. सन 2013 पासून भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, 2013 या कायद्यान्वये भूसंपादनाची कार्यवाही केली जाते.

या कायद्यातील तरतुदीनुसार भूसंपादन प्रक्रियेचे संपूर्ण डिजिटल व्यवस्थापन करण्यासाठी शासनाच्या “सेवाविषयक बाबींच्या अनुषंगाने 150 दिवसांचा सेवाकर्मी कार्यक्रम” अंतर्गत भूसंपादनासाठी विशेष सॉफ्टवेअर विकसित करण्याची जबाबदारी महाराष्ट्र शासनाने जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्यावर सोपवली होती. त्यानुसार नांदेड जिल्ह्यात https://mahabhusampadan.in, या संकेतस्थळाची निर्मिती करण्यात आली आहे.

या महाभूसंपादन पोर्टलच्या माध्यमातून नांदेड जिल्ह्यातील भूसंपादनाची प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार आहे. या सॉफ्टवेअरमध्ये जिल्हाधिकारी, भूसंपादन अधिकारी, संपादीत संघ तसेच भूमी अभिलेख विभागासाठी स्वतंत्र लॉग-इन सुविधा उपलब्ध आहे.

या पोर्टलचे वैशिष्ट्य म्हणजे, संपादन यंत्रणेकडून भूसंपादन प्रस्ताव सादर झाल्यापासून ते भूधारकांना मोबदला वाटप होईपर्यंतची संपूर्ण प्रक्रिया सॉफ्टवेअरद्वारे पार पडणार आहे. यामध्ये कमी-जास्त पत्रके, नवीन सातबारा उतारे तयार होणे, इतर पत्रव्यवहार, अधिसूचना, भूधारकांना नोटीस आदी सर्व कागदपत्रे ऑटो-जनरेट पद्धतीने तयार होतील. त्यामुळे कार्यालयीन कामकाजात गती व अचूकता येणार आहे.

भूसंपादन प्रक्रिया ऑनलाईन झाल्यामुळे निवाडे विनाविलंब होतील. परिणामी जनतेच्या उपयोगाचे प्रकल्प वेळेत पूर्ण होऊन शासनाचा खर्चही कमी होणार आहे. भूधारकांना त्यांच्या जमिनीच्या संपादनाबाबतची माहिती व नोटीस थेट मोबाईलवर मिळण्याची सुविधाही या प्रणालीमध्ये उपलब्ध आहे.

या प्रणालीचा प्रायोगिक वापर करताना भूसंपादन अधिकारी व कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त केले असून, महाभूसंपादन पोर्टलमुळे कार्यालयीन कामकाज अधिक सुसूत्र, पारदर्शक व वेळेत होत असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. सध्या भूसंपादन अधिनियम, 2013 अंतर्गत सुरू असलेली सर्व प्रकरणे या सॉफ्टवेअरद्वारे हाताळण्यात येणार आहेत. पुढील टप्प्यात महाराष्ट्र महामार्ग अधिनियम, 1955, महाराष्ट्र औद्योगिक वसाहत अधिनियम, 1961, रेल्वे (सुधारणा) अधिनियम, 2008 तसेच राष्ट्रीय महामार्ग अधिनियम, 1956 अंतर्गत होणाऱ्या भूसंपादन प्रक्रियेचाही या सॉफ्टवेअरमध्ये समावेश करण्यात येणार आहे.

या संकेतस्थळावर भूसंपादनाशी संबंधित कायदे, नियम, शासन निर्णय, कलम 1 व 19 अंतर्गत अधिसूचना सर्व नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तसेच सन 2013 पासून नांदेड जिल्ह्यात घोषित झालेल्या सर्व भूसंपादन निवाड्यांचा तपशील महाभूसंपादन पोर्टलवर उपलब्ध आहे. नोटीस व माहिती थेट मोबाईलवर मिळत असल्याने भूसंपादन प्रक्रियेत अधिक पारदर्शकता येऊन तक्रारींचे प्रमाण कमी होण्यास मदत होणार आहे.

ही प्रणाली विभागीय आयुक्त, छत्रपती संभाजीनगर जितेंद्र पापळकर यांनी गठित केलेल्या समितीच्या मार्गदर्शनाखाली, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या नेतृत्वात विकसित करण्यात आली आहे. या प्रणालीच्या निर्मितीत अपर जिल्हाधिकारी पी. एस. बोरगावकर, अपर जिल्हाधिकारी रत्नदीप गायकवाड, उपविभागीय अधिकारी प्रविण मेंगशेट्टी, उपजिल्हाधिकारी श्रीमती प्रियांका पवार, उपविभागीय अधिकारी विकास माने, नायब तहसीलदार सतीश कुलकर्णी, आय.टी. कन्सल्टंट संतोष निलेवार तसेच भूसंपादन सहायक संदीप ढवळे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. महाभूसंपादन पोर्टलच्या वापरामुळे भूसंपादन प्रक्रियेत पारदर्शकता, गतिमानता व लोकाभिमुखता येणार असून प्रशासनासाठी हा एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.

जिल्हाधिकारी राहुल कर्डिले : महाभूसंपादन पोर्टलमुळे भूधारकांना भूसंपादनाशी संबंधित माहिती, अधिसूचना व स्थिती पाहण्यासाठी सुलभ व्यवस्था उपलब्ध झाली आहे. यामुळे पारदर्शकता येणार असून भू-धारकांना भूसंपादनाबाबतची माहिती तात्काळ मिळणार आहे. तसेच मोजणीमध्ये अक्षांश-रेखांशासह आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरामुळे अचूकता येणार असून प्रशासकीय कामकाज अधिक सुलभ व पारदर्शक होणार आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये याचा वापर करणे प्रस्तावित आहे.

In Nanded district Launch of 'Mahabhu Sampadan Portal'
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleRoad Safety Campaign : रस्ता सुरक्षा अभियान २०२६चा नांदेडमध्ये शुभारंभ
Next Article MPDA : येळी येथील रेती तस्कर मुरलीधर ढगे एमपीडीए अंतर्गत स्थानबद्ध
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी

Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड

पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

देशाला 2047 पर्यंत विकसित राष्ट्र बनविण्याच्या प्रधानमंत्री मोदी यांच्या संकल्पसिद्धीला बळ देणारा अर्थसंकल्प – उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजनमंत्री अजित पवार

March 10, 2025

Ex. Chief Minister Ashok Chavan : विकासाच्या कामामध्ये कोणी आडवा आला तर त्याचा मुकाबला केल्याशिवाय राहणार नाही -माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण -NNL

September 4, 2024

People’s High School Nanded concluded : पिपल्स हायस्कूल नांदेडच्या १९७७ दहावी बॅचचा स्नेहमेळावा संपन्न

February 5, 2025

domestic cow rearing subsidy : देशी गायींचे पालन पोषण अनुदानासाठी ऑनलाईन अर्ज करण्यास 5 जानेवारीपर्यत मुदतवाढ -NNL

December 30, 2024
Advertisement
टॉप बातम्या

Mla Bondharkar supported ; आगीत संसार उघड्यावर आलेल्या गोदावरी वाघमारे यांना आ. बोंढारकरांनी दिला आधार -NNL

Ceo.Meenal Karanwal । प्रेरणादायी नेतृत्वाचे एक वर्ष: मीनल करनवाल यांचा यशस्वी प्रवास- मिलिंद व्यवहारे, नांदेड -NNL

Mla. Baburao Kadam Kohlikar : पारितोषिकेतून स्पर्धा निर्माण होतात; स्पर्धेतून उच्च पदस्थ अधिकारी तयार होतो – आ. बाबुराव कदम कोहळीकर

श्री गुरु गोबिंदसिंघजी गोल्ड एंड सिल्वर कप हॉकी स्पर्धेस प्रारंभ -NNL

illegal sand transportation : लिंबगाव पोलिसांची अवैध वाळू वाहतूक विरोधातील धडक कारवाई – ₹10,10,000 किमतीचा मुद्देमाल जप्त

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

March 12, 2026

heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी

March 12, 2026

Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

March 12, 2026

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

March 11, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?