नांदेड| शनिवार दि.12 ऑक्टोबर रोजी श्री क्षेत्र नारायण गडावर मराठायोद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणाऱ्या पहिल्या दसरा मेळाव्याला अखंड राज्य भरातून करोडोच्या संख्येने समाज बांधव उपस्थित राहणार आहेत, त्याच अनुषंगाने नांदेड जिल्ह्यात सुद्धा जय्यत तयारी चालु असुन नांदेड जिल्ह्यातील 16 च्या 16 तालुक्यात नियोजन आढावा बैठका मराठा सेवकांच्या माध्यमातून घेण्यात येत आहेत.
तालुक्यातील प्रत्येक बैठकीत उदंड असा प्रतिसाद मिळत असुन, सदरील बैठकीत *दसरा मेळावाच्या* अनुषंगाने नियोजनावर चर्चा करून प्रत्येक तालुक्यातील जिल्हा परिषद सर्कल निहाय गावा गावात मराठा सेवकांचा ताफा जाऊन जनजागृती करीत लाखोंच्या संख्येने नारायणगडावर दसरा मेळाव्यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन करीत समाज बांधवांच्या एकीची वज्रमुठ करण्याचं काम सध्या मराठा सेवकांच्या माध्यमातून जबाबदारी वाटून घेत मराठा समाजा सहित इतर आठरा पगड जातीतील अलुतेदार बलुतेदार यांना सोबत घेऊन गरजवंतांच मजबुत संघटन बांधणी करण्याचं काम जोरात सुरु आहे.
आज पर्यंत लोहा, कंधार, उमरी, भोकर, नांदेड दक्षिण, नांदेड उत्तर, हदगांव, हिमायतनगर, माहूर एवढ्या तालुक्यातील प्रमुख मराठा सेवकांच्या बैठका पार पडल्या असुन उर्वरित तालुक्यातील बैठका ह्या 10 ऑक्टोबर च्या आत घेऊन तालुक्यातील सर्कल निहाय टीम बांधणी करून गावा गावातील गरजवंतांना एकत्र करीत भव्य असा पारंपारिक दसरा मेळावा उत्साहात साजरा करण्याचा विडा मराठा सेवकांनी उचलला आहे.
दसरा मेळाव्याला जात असताना समाज बांधवानी सोबत जेवनाचा डब्बा, पाण्याची बॉटल, डोक्याला पांघरण घेऊन अतिशय शिस्तीत जायचं व तसंच शिस्तीत परत यायचं अशा सुचना सुद्धा देण्यात येत आहेत.आचार संहितेच्या अगोदर सरकारने मराठा समाजाचा ओबीसी आरक्षणाचा मुद्दा निकाली काढुन समाजाला न्याय द्यावा अन्यथा विधासभेमध्ये होणारा राजकीय संघर्ष हा सरकारला परवडणारा नसेल असा ईशारा सुद्धा या बैठकांच्या माध्यमातून देण्यात येत आहे.