नांदेड| युवा सेनेचे पक्ष प्रमुख माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे नांदेड दौऱ्यावर आले असता किसान जन आंदोलन भारतचे संस्थापक अध्यक्ष सचिन कासलीवाल यांनी भेट घेऊन आदित्य ठाकरे यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर केले.


युवासेना पक्षप्रमुख माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची अतिवृष्टीच्या दौऱ्याच्या अनुषंगाने नांदेड येथे विमानतळावर किसान जन आंदोलन भारतचे संस्थापक अध्यक्ष सचिन कासलीवाल यांनी भेट घेतली. यावेळी शेतकऱ्यांच्या हितासाठी महाराष्ट्र शासनाने लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अशा विविध मागण्यासाठी सचिन कासलीवाल यांनी किसान जन आंदोलन भारतच्या वतीने युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे निवेदन देण्यात आले.




