नांदेड। सार्वजनिक आरोग्यविभागाच्या 2024-25 च्या “कायाकल्प पुरस्कार” स्पर्धेत नांदेड जिल्ह्यातील सर्व उपकेंद्र मधून ‘उपकेंद्र कामठा(बु) ला प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाला आहे.या उपकेंद्रात आरोग्य विषय पायाभूत बाबींचे मुल्यांकन केल्यानंतर या उपकेंद्रातील कर्मचारी अधिकाऱ्यांच्या परिश्रमामुळे जिल्ह्यातील प्रथम क्रमांकाचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.


यावर्षी नांदेड जिल्ह्यातील पन्नास टक्के पेक्षा अधिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र या स्पर्धेत पात्र ठरले आहेत त्यामुळे राज्यात कायाकल्प पुरस्कारा मध्ये नांदेड जिल्हा आवल ठरला आहे.दवाखान्यातील आरोग्य विषय पायाभूत सेवा, सुविधा, स्वच्छता, सर्व रेकॉर्ड व इतर बाबींचे मूल्यांकन करण्यात येऊन प्राप्त गुनानुसार “कायाकल्प पुरस्कार” देण्यात येतो.

कामठा बु.येथील उपकेंद्रातील कामकाज व आरोग्य विषयक पायाभूत बाबींचे मुल्यांकन केले आणी या ठिकाणी असलेल्या स्टाफच्या परिश्रमामुळे या उपकेंद्राला जिल्ह्यातील उपकेंद्रामधून प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाला आहे या पुरस्कार मिळाल्याबद्दल आरोग्य विभागाने कौतुक केले आहे.


पुरस्कार मिळाल्याबद्दल जिल्हा आरोग्य अधिकारी श्रीमती डॉ.संगीता देशमुख ,अर्धापूर तालूका आरोग्यअधिकारी श्री. डॉ.श्रीकांत देसाई ,वैध्यकीय अधिकारी डॉ. श्याम सावंत ,अरुण गादगे यांच्या मार्गदर्शनामुळे व उपकेंद्र कामठा(बु) अंतर्गत कार्यरत आरोग्य सेविका श्रीमती भाले,श्रीमती खुळे, एम.पी.डब्लू. श्री संदीप मांजरमकर, पवार व सर्व आशाताई यांच्या मेहनतीमुळे हे यश मिळाले असल्याचे उपकेंद्र कामठा (बु) च्या समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. बनसोड मॅडम यांनी सांगितले.


