हिमायतनगर (उत्कर्ष मादसवार) तालुक्यातील मौजे धानोरा येथील जेष्ठ नागरिक कलावतीबाई शंकर पंदलवाड यांचे गुरुवारी दुपारी 3 वाजता हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.


स्व. कलावतीबाई या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या लीगल सेलचे एडवोकेट तथा दैनिक गोदातीरचे हिमायतनगर तालुका प्रतिनिधी अॅड. ज्ञानेश्वर पंदलवाड यांच्या मातोश्री होत. त्यांच्या मृत्यूनंतर तीन मुले, एक मुलगी व नातू पंतू असा परिवार आहे.


त्यांच्या पार्थिवावर शुक्रवारी सकाळी ११ वाजता धानोरा येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो. हीच नांदेड न्यूज लाईव्ह परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली. 🕊️




