श्रीक्षेञ माहूर, कार्तिक बेहेरे| अतिदुर्गम आदिवासी ग्रामीण भागातील गोरगरिबांसाठी आरोग्य शिबिर घेणे गरजेचे आहे. त्यातून गोरगरीब जनतेला लाभ मिळेल, असे प्रतिपादन सिंदखेड ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक रमेश जाधवर यांनी केले.
वायफनी येथे १३ डिसेंबर रोजी स्व. आशीर्वाद साहेबराव पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त आरोग्य, रक्तदान, नेत्र तपासणी शिबिर घेण्यात आले.वायफनी येथे ग्रामीण भागात प्रथमच आरोग्य, रक्तदान शिबिर व डोळे तपासणी करुण चष्मे वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला होता. या शिबिराला मोठा प्रतिसाद मिळाला. याप्रसंगी ५१ जणांनी रक्तदान केले तर हुजूर साहेब रक्त पेढी ब्लड बैंक नांदेड व लायसन क्लब नांदेडच्या वतीने मोफत डोळे तपासणी व ऑपरेशन मोफत करण्यात आले.
यावेळी ७६० पैकी ४०० गरजुंना मोफत चष्मे वाटप करण्यात आले. यावेळी शासकीय कंत्राटदार राजू श्रीरामवार व प्रा. मेरसिंग पवार यांनी रक्तदान शिबिर, नेत्र तपासणी व मोफत चष्मे वाटपाच्या शिबीरा प्रसंगी तज्ञ डॉक्टरांची मोठी टीम दाखल झाली होती. शिबिराचे आयोजक पिंटू आशीर्वाद पाटील, सोनू पाटील, श्रीमती अश्विनी आशीर्वाद पाटील यांचे अभिनंदन केले.
शिबिर यशस्वीतेसाठी डॉ. नकुल कदम, डॉ. पंकज टनमने, डॉ. संस्कृती कदम, डॉ. शिवानी नरवाडे आदी तज्ञ डॉक्टरांची उपस्थिती होती. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच गोकर्णा सुरेश अंकुरवार, उपसरपंच अरविंद पाटील, जगदीश पाटील नरवाडे, पत्रकार नितीन पाटील कन्नलवार,त्रिंबक पुनवटकर, सचिन जाधव, चाऊस, बाबूसिंग राठोड, ग्राम विकास अधिकारी गंगाकिसन अनलोड आदिंची उपस्थीती होती. प्रास्ताविक अश्विन वाघमारे यांनी केले तर आभार पिंटू पाटील यांनी मानले.