नांदेडमहाराष्ट्र

Interview of District Collector on water reservoirs and water conservation : पाणीसाठे व जलसंधारण विषयावर जिल्हाधिकाऱ्यांची गुरुवारी आकाशवाणीचे केंद्रावर मुलाखत – NNL

नांदेड| नांदेड जिल्ह्यातील पाणीसाठे,जलसंधारणाची कार्य, भूगर्भातील पाणी पातळी आदी विषयांवर एक विशेष मुलाखत उद्या आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून सकाळी 8.40 वाजता प्रसारित होणार आहे. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांची ही मुलाखत असून श्रोत्यांनी या मुलाखतीचा आनंद घ्यावा, असे आवाहन आकाशवाणीचे केंद्रप्रमुख विश्वास वाघमारे यांनी केले आहे.

गेल्या वर्षभरात झालेल्या जलसंधारणाच्या कार्यामुळे, शेततळे, नाला खोलीकरण, रूंदीकरण यामुळे पाणी पातळी वाढण्यासाठी मदत झाली आहे. तसेच जिल्ह्यातील धरणाची स्थिती यावर्षीचा पाऊस, पावसा संदर्भातील नियोजन, तसेच शेतकऱ्यांसाठी असणारा सल्ला व सामान्य नागरिकांनी भूजल पातळी वाढविण्यासाठी करावयाचे प्रयत्न, या संदर्भातील जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांची अभ्यासपूर्ण मुलाखत उद्या सकाळी प्रसारित होणार आहे. जिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके यांनी ही मुलाखत घेतली आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button