हिंगोली। कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संतोष टारफे व कळमनुरी विधानसभा मतदारसंघ शिवसेना नेते डॉ. रमेश देवराव मस्के (नाईक) यांनी दि.16/07/2024 रोजी रात्री झालेल्या सिरसम,लोहरा,पिंपळदरी, सावरगाव,धोत्रा, पळसोना, बोरजा,खडकद,वऱ्हाडी, भटसावंगी,येथे अतिवृष्टी,ढगफुटी सदृश पावसामुळे झालेल्या नुकसानीची व लोहरा येथील तळे फुटल्यामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली.
यामध्ये शेतकऱ्यांच्या जमिनी खरडून गेल्या. पिके, फळबागा, सिंचन व शेती साहित्य, विद्युत मोटारी इ. वाहून गेले, जमिनी खरडून गाळ वाहून विहीर बुजण गेल्या,विद्युत पोल,पाइप,डी.पी. इ. न भरुन निघणारे नुकसान झाले.
याबद्दल नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना, धीर देत जिल्हाधिकारी व तहसीलदार यांना नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करून नुकसान ग्रस्तांना तातडीने योग्य तो मोबदला देण्यासोबतच यासर्व गोष्टींचा विचार व्हावा यासाठी संपर्क केला . शिवसेना जिल्हा संघटक बाळासाहेब मगर, माजी जि.प. अध्यक्ष गणाजी बेले, पंढरीनाथ ढाले पाटील,पंजाब गडदे,केशव चिकाळकर,पंकज होडबे यासह शेतकरी, शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.