हिमायतनगर। मृग नक्षत्र सुरू झाल्यावर सोमवार पासून हिमायतनगर तालुक्यात वादळी वारे विजांचा कडकडाट होऊन पावसाचं आगमन होत आहे. त्यातच वीज कोसळून हिमायतनगर तालुक्यातील मौजे कामारवाडी जवळील पंजाबराव नगर शिवारात विज पडून चार जनावरे ठार झाली तर तीन गुरे गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवार रात्री 10 वाजेच्या सुमारास घडली . यात शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झाले आहे.


हिमायतनगर तालुक्यात काही भागात पाऊस तर काही भागात कोरडं अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. दिवसा उकाडा तर सायंकाळी वादळी वारे, विजांचा कडकडाट होऊन पाऊस पडतो आहे. सोमवारी हिमायतनगर तालुक्यातील कामारवाडी पंजाबराव नगर परिसरात विजांचा कडकडाट होऊन वीज कोसळली यात शेतकरी चंद्रकुमार गणपतराव वानखेडे यांनी नित्यनेमाने शेतीची कामे आटोपून चंद्रकुमार यांनी सायंकाळी आपली सात गुरे शेत सर्व्ह क्रमांक 30 मधील लिंबाच्या झाडाखाली बाधली होती.


दरम्यान रात्री 6 वाजून 45 मिनिटांनी आचानक वादळी वारे व विजांचा कडकडाट झाला आणि गुरे बांधलेल्या झाडावर वीज कोसळली झाडाखाली असलेल्या चार जनावरे ठार तर तीन गुरे गंभीर जखमी झाली आहेत. यात एक म्हैस, एक वगार, एक गाय एक वासरू ठार गतप्राण झाले. या नैसर्गिक आपत्तीमुळे सदर शेतकऱ्यांचे दोन लाख रूपयाचे नुकसान झाले आहे .घटनास्थळी तलाठी श्री पुरी यांनी भेट देऊन पंचनामा केला आहे. या नुकसाणीतून सावरण्यासाठी प्रशासनाने शेतकऱ्यांस नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे.
