उस्माननगर l सध्या विधानसभा निवडणुकीत व्यस्त असलेल्या महसुल अधिकारी यांची नजर चुकवून
लोहा तालुक्यातील मौजे चिंचोली येथील गोदावरी नदी पात्रातून संक्शन यंत्राच्या साह्याने व परप्रांतीय मजुरांमार्फत रात्रंदिवस अवैध वाळू उपसा साठेबाजी व हायवा टिप्परने वाहतूक अगदी बिनधास्त सुरू आहे.
महसूल प्रशासन मात्र निवडणूक कामात व्यस्त असल्याच्या संधीचा फायदा पुरेपर या भागातील वाळूमाफींयाकडून घेतला जात आहे. यामुळे शासनाचा लाखोंचा महसूल बुडत आहे, एकीकडे विधानसभा निवडणुकीची लगबग सुरू आहे .
महसूल प्रशासन या कामात व्यस्त आहे .तर दुसरीकडे मात्र चिंचोली शिवारातील देवापुर बंधाऱ्या लगतच गोदावरीच्या नदीपात्रातून सक्शन पंपाने नदीपात्रात तुडुंब पाणी असतानाही वाळू उपसा सुरू आहे व उपसा केलेल्या वाळूची साठवणूक नदीच्या पैलतीरावर वेगवेगळ्या ठिकाणी केली जात आहे व त्यानंतर हायवा टिप्परच्या साह्याने राजेरोशपणे चोरट्या मार्गाने उपसा केलेल्या वाळूची विक्री केली जात आहे.
यामुळे या नदीपात्रात बांधलेल्या देवापूर बंधाऱ्याच्या बांधकामास धोका होण्याची शक्यता निर्माण झाली आहे कोट्यावधी रुपये खर्च शेतकऱ्यांचे हितासाठी बांधलेला बंधारा यामुळे कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही याकडे जिल्हा प्रशासनाने वेळीच लक्ष केंद्रित करावे व हा अवैध वाळू उपसा थांबवावा अशी मागणी होत आहे कारण यामुळे शासनाचा लाखोंचा महसूल पण या अवैध वाळू उपशामुळे बुडत आहे मात्र वाळू माफियांचे चांगभले होत आहे…