नांदेड| रात्रीच्या झालेल्या दमदार पाऊसास व सकाळच्या ढगाळलेल्या वातावरणास न जुमानता शहरी व ग्रामिन भागातून आलेल्या ज्येष्ठ व अतिज्येष्ठ महिला-पुरूषांनी कलामंदिर परिसर खचाखच्च भरून ओंसांडून वाहात होता.
पदयात्रेचे एकूनच सुरेख नियोजन संस्थेच्या महिला विभागाच्या अध्यक्षा डाॅ.शितल ताई भालके यांचे होते. सुरूवातीस नांदेडचे सुप्रसिद्ध मो.रफी(मंजूर हस्मी)’मुकेश(पत्रकार विजय बंडेवार), महेंद्र कपूर (शिवहर तोडकरी), मन्नाडे (अब्दूल गनी चौधरी), कवि प्रदिप (डाॅ.हंसराज वैद्य),कांही ज्येष्ठ नागरिका मधून महिला व पुरूष अदीनीं सुरेल अशा भाव गीतं-भक्तीगीतं,तांची मनोरंजन मेज वानीवर ज्येष्ठ नागरिकांनी यथेच्छ ताव मारला.*
ठिक साडे आकराच्या सुमारास ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा उद्योकपति मा.नविनभाईजी ठक्कर यांच्या शुभ हस्ते पदयात्रेस हिरवी झंडी दाखऊन सुरूवात करण्यात आली.तिन-तिन जन अत्यंत शिस्तीत शांत पणे चालत होते.रस्त्याच्या दुतर्फा ज्येष्ठ नागरिक पदयात्रींना सुभेच्छा देत होते.हात वारे करत होते. अत्यंत विलोभनीय दृष्य होते.विशेष म्हणजे कलामंदिर ते जिल्हाधिकिरी कार्यालया पर्यंत पोलिस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवलेला होता.कुठलाच अनुचित प्रसंग न घडू देता पदयात्रा संपन्न होऊ शकली. प्रशासनाच्या अंदाजानुसार व म्हनण्यानुसार पदयात्रा “न भूतोच” ठरली. जिल्हाधिकारी कार्यालया समोरील रस्ता सामान्य रूग्णालया पासून ते जिल्हाधिरी कार्यालयाच्या डाविकडील मुख्य द्वारापर्यंत ज्येष्ठ नागरीक अक्षरशः कोंबल्यागत भरलेले होते..
या पदयात्रेचे दुसरे वैशिष्ठ्य म्हणजे नांदेड उत्तर विधान सभेचे आमदार मा.श्री.बालाजी कल्याणकरांची भेट. ते म्हणाले की मी असला आणि एवढा मोठा ज्येष्ठ नागरिकांचा मोर्चा पहिल्यांदाच पहात आहे!तुम्हा माय-बापांच्या न्याय मागण्या आपले महाष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्रीजी नक्कीच मान्य करतील!मी आपल्या सर्व मागण्या मान्य होई पर्यंत स्वस्थ बसणार नाही.आपल्या अध्यक्षाची येत्या चार पाच दिवसातच मा.मुख्य मंत्र्यांची भेट घडवू आणून सकारात्मक चर्चा व नार्णय घडवू आणण्यास कटीबद्ध आहे.स्वस्थ बसणार नाही!असे म्हणताच 15-20 हजार ज्येष्ठ नागरिकांनी टाळ्यांचा वर्षाव करून व जय घोष करून दाद दिली.
तदनंतर स्वतः मा.आमदार साहेबा बरोबर जाऊन जिल्हाधिकारी महोदयांमार्फत मुख्यमंत्रीजी व उपमुख्य मंत्री द्वयांना निविदने पाठविण्यात आली. पदयात्रा आणि लाक्षणिक उपोषणाची सांगता करण्यात आली. पदयात्रेचे नेतृत्व महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ (फेस्काॅम) चे उत्तर मराठवाड्याचे नव निर्वाचित अध्यक्ष डाॅ.हंसराज वैद्य,कोषाध्यक्ष गिरिष बार्हाळे, सचिव प्रभाकर कुंटुरकर तसेच माधवराव पवार,जयंत सोमावाड, रामचंद्र कोटलवार,अॅड.कोंडीबा पवार,डाॅ.पुष्पा कोकीळ, काॅ. जिंतूरकर,सयद मौला,राम पवार अदी उपस्थित होते.