नवीन नांदेड l नांदेड वाघाळा शहर महानगर पालिकेच्या वतीने माध्यमिक व उच्च माध्यमिक परिक्षेत विशेष गुणवत्ता यादी मध्ये आलेल्या अधिकारी व कर्मचारी यांच्या पाल्याच्या सत्कार आयुक्त डॉ.महेश कुमार डोईफोडे जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम व महापालिकेत विविध विभागांच्या सहाय्यक आयुक्त यांच्या उपस्थितीत 7 जूलै रोजी मनपा मुख्यालय येथे करण्यात आला.


यावेळी सिडको क्षेत्रीय कार्यालय येथील सहाय्यक आयुक्त डॉ मिर्झा बेग यांच्या चि. आयन ,वसुली लिपीक मारोती सारंग यांच्यी मुलगी कल्याणी वसुली लिपीक मालु एनफळे यांच्या मुलगा शिवकुमार व लिपिक अर्चना जोंधळे यांच्यी मुलगी प्राजक्ता यांच्या सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र,रोख रक्कम धनादेश पुष्प गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. मनपाच्या वतीने सन्मान झाल्याबद्दल नवीन नांदेड मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष रमेश ठाकूर व छायाचित्रकार सारंग नेरलकर यांनी सत्कार करून शुभेच्छा दिल्या.


