नांदेड | श्री गुरु तेग बहादर साहिब यांनी तत्कालीन शासकांतर्फे जोर जबरदस्तीने धर्म परिवर्तनासाठी प्रताडीत करण्यात येत होते. त्यावेळी गुरु साहिबांच्या समक्ष कश्मिती पंडीतांनी व्यथा मांडली त्यावेळी गुरु तेग बहादर साहिबांनी या जबरन धर्म परिवर्तनाचा पुरजोर विरोध केला व राष्ट्र, मानवता व धर्म रक्षणासाठी आपले बलिदान दिले (शहादत दिली). या शहादत समागम ला 350 वर्ष पूर्ण होत आहेत. त्या निमित्ताने हिंद-दी-चादर श्री गुरु तेग बहादर जी के 350वें शहादत समागम तथा गुरतागद्दी समागम दि. 23 ते 25 नोव्हेम्बर 2025 पर्यंत गुरुद्वारा सचखंड बोर्डातर्फे आयोजित करण्यात आलेले आहे.


या समागमाच्या निमित्ताने येणाऱ्या भाविपिढी व विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम, मानवता व धर्म रक्षणाची भावना निर्माण व्हावी त्याकरीता गुरुद्वारा तख्त सचखंड साहिबचे माननिय पंजप्यारे साहिबान यांच्या सरप्रस्तीमध्ये गुरुद्वारा बोर्डाचे प्रशासक मा. डॉ. विजय सतबीर सिंघ जी यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड शहरातील सर्व शैक्षणिक संस्था, शाळा महाविद्यालये इत्यादी मध्ये विद्यार्थ्यांच्या माहिती साठी गुरु साहिबच्या जीवनावर प्रकाश टाकणारे ऐतिहासिक साहित्य वितरीत करण्यासाठी आज. दि. 18/11/2025 रोजी सकाळी 10:00 वाजता गुरुद्वारा तख्त सचखंड साहिब पासून आदरणिय सिंघ साहिब भाई राम सिंघ जी सहियोगी जत्थेदार यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये शैक्षणिक संस्थाचे विभाग प्रमुख, निदेशक, कर्मचारी इत्यादींची टीम साहित्यासह रवाना करण्यात आली.


यांच्याद्वारे सर्व शैक्षणिक संस्थाच्या प्रमुखांना निमंत्रण देण्यात येणार आहे तसेच या शैक्षणिक संस्थांमध्ये निबंध व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यासाठी शासन आदेश काढण्यात आलेले आहे त्यानुसार कारवाई करावी तसेच गुरुद्वारा बोर्डातर्फे ही स्पर्धा घेण्यासाठी निवेदन देण्यात येत आहे. जेणे करुन येणाऱ्या भावी पिढी समक्ष गुरु साहिबजींनी जे मानव धर्म रक्षाणासाठी, धर्म परिवर्तनाच्या विरोधात आपले बलिदान देऊन मानवतेची रक्षा केली त्या बाबत प्रेरणा मिळावी त्या करीता हे कार्यक्रम आयोजित करण्या यावे अशी विनंती करण्यात येत आहे.


यावेळी मानयोग सिंघ साहिब भाई राम सिंघ जी सहियोगी जत्थेदार, गुरुद्वारा बोर्ड के अधिक्षक – स. हरजीत सिंघ कडेवाले, सहा, अधिक्षक स. रविंदर सिंघ कपूर, स. जैमल सिंघ ढिल्लो, स. बलविंदर सिंघ फौजी, स. गुरुबचन सिंघ प्रचार्य, श्रीमती बबीता कौर स्विय सहा., श्रीमती अनिल कौर प्राचार्य, स. चांद सिंघ -मुख्याध्यापक, स. शरण सिंघ सोढी- संयोजक, स. राजदेविंदर सिंघ कल्ला ओ.एस.डी., स. प्रदीप सिंघ मान, स सतविंदर सिंघ अकाउंटेंट स. धन्ना सिंघ जमदार, इत्यादी उपस्थित होते.



