हिमायतनगर, अनिल मादसवार l तालुक्यातील आदिवासी बहुल भागात येणाऱ्या मौजे गणेशवाडी तांडा येथील अनेक नागरिक मछरांची अति आत्पत्ती, घाण व दूषित पाण्यामुळे हैराण झाले असून, हात पाय दुखने, ताप व अन्य समस्यांचा त्रास होत असल्यामुळे चिंचोर्डी प्राथमिक रुग्णालयात दाखल केले असता चिकुन गुणिया सदृश आजाराची लागण झाली असून, अनेकजण तापीने ग्रस्त असल्याचे सांगितले जात आहे. आरोग्य विभागाने गावभेटी देऊन पावसाळ्यापूर्वी जनजागृती केली नसल्याने हि परिस्थिती उद्भवली असल्याचा आरोप नागरीकातून केला जात आहे. याकडे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ संगीता देशमूख यांनी लक्ष केंद्रित करून साथीच्या आजाराचा फैलाव होण्यापूर्वी ठोस उपाययोजना कराव्यात अशी मागणी होत आहे.


नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यात येणाऱ्या सवना सर्कलमध्ये गणेशवाडी तांडा हे आदिवासी बहुल भागातील छोटास गाव आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असून गाव परिसरात स्वच्छता होत नसल्याने घरांवर पाण्याचे डबे सातून राहिल्याने मच्छरांची अतिपती होऊन गावातील नागरिकांना ताप, सर्दी, खोकला, डायरिया, हाथ पाय व गुढगे दुखणे अशा प्रकारच्या आजाराने ग्रासले आहे. त्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांनी चिचोर्डी प्राथमिक आरोग्य केंद्रांत उपचारासाठी गर्दी केली असून, संख्या वाढू लागल्याने गणेशवाडी तांडा येथे आरोग्य विभागाने पथक लाऊन उपचार सुरु केले आहेत. आ. बाबुराव कदम कोहळीकरांनी भेट देत आरोग्य विभागाला सूचना दिल्या. मात्र ग्रामीण भागात अद्यापही जनजागृतीचा अभाव आहे.

एकूणच हा आजार चिकुनगुणिया सदृश्य असल्यामुळे 50हुन अधिक रुग्णांचे नमुने तपासणीसाठी लॅबला पाठविण्यात आल्याचे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. रविकांत देशमुख यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले. एकूणच गणेशवाडी तांडा गावात ठिकठिकाणी साचलेल्या घाण पाण्याच्या डबक्यासह परिसरात डासांची उत्पत्ती वाढू नये म्हनून धूर फवारणी करून डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि डेंगू सारख्या आजाराचा शिरकाव होऊन साथीच्या आजाराचा फैलाव अन्य गावात पसरण्यापूर्वी आजाराचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रयत्न करावे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ संगीता देशमूख यांनी हिमायतनगर तालुक्यातील गणेशवाडी तांडा, गणेशवाडी येथील साथीच्या आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी ठोस पाऊल उचलावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे.


आरोग्य विभागाने प्राथमिक तपासणी दरम्यान काही रुग्णांमध्ये डेंग्यू व चिकनगुनियाची लक्षणे आढळून आली आहेत. त्यामुळे गावात फवारणी, डास नियंत्रण मोहिमा राबविण्याची मागणी होत आहे. स्थानिक प्रशासनाने त्वरित वैद्यकीय पथक नेमून तपासणी सुरू केली आहे. आरोग्य विभागाने नागरिकांना आवाहन केले कि, गावात पाणी साचू न देणे, घराभोवती स्वच्छता राखणे, आणि शरीर झाकले जाईल असे कपडे वापरणे, आणि पाण्याचे साहित्य स्वच्छ ठेवणे अशी दक्षता घेण्याचे आवाहन केले आहे.
सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने गावपातळीवर आरोग्य सेवीका, आरोग्य सेवक, समुदाय यांनी आरोग्यासाठी जनजागृती करणं गरजेचं असुन, अद्याप एकाही गावात जनजागृती झाली नाही. तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी गावोगावी भेटी देणं गरजेचं असुन, त्यांचेही याकडे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, समुदाय अधिकारी यांनी आपल्या उपकेंद्राच्या ठिकाणी मुख्यालयी रहाणं गरजेचे असले तरी तालुक्याच्या ठिकाणी राहून उंटावरून शेळ्या हाकण्याचे करत आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी यांनी प्रत्येक उपकेंद्रा अंतर्गत येणाऱ्या गावाला भेटी देणे व आरोग्य शिबीर घेऊन जनजागृती करणं गरजेचं असतांना अद्यापही भेट दिली नसल्याने आरोग्य यंत्रणा कागदावर सुरू असल्याचे चित्र आहे.


तालुका अधिकारी करतात जिल्ह्यावरून अपडाउन
तालुका आरोग्य अधिकारी यांनी चिचोर्डी प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत येणारे उपकेंद्र व सरसम प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत येणारे उपकेंद्र व उपकेंद्रा अंतर्गत येणारी गावे या गावाला पावसाळ्याचे दिवस असल्याकारणाने भेटी देणं गरजेचं आहे. मात्र तालुका अधिकारी हे आरोग्य केंद्रासह गावांना भेटी न देता जिल्ह्यावरून अपडाउन करीत कारभार हाकत आहेत. त्यामुळे नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले असुन, याकडे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संगीता देशमुख यांनी लक्ष देणं गरजेचं आहे.

