नवीन नांदेड l सिडको हडको भागातील विविध ठिकाणी असलेल्या हनुमान मंदिर येथे हनुमान जन्मोत्सव निमित्ताने महाअभिषेक, विधीवत पूजन, हनुमान चालीसा , हनुमान स्तोत्र पठण करुन महाआरती करण्यात आली व भाविक भक्तांसाठी महाप्रसाद आयोजन करण्यात आले.


12 एप्रिल रोजी हनुमान जन्मोत्सव निमित्ताने सिडको परिसरातील गुरूदेव दत्त मंदिर येथे महाअभिषेक, महापुजा व महाप्रसाद आयोजन माजी नगरसेविका ललिता शिंदे व गुरूदेव दत्त मंदिर महिला पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले. दक्षिण मुखी काळा हनुमान मंदिर संभाजी चौक सिडको येथे हनुमान जन्मोत्सव निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताह आयोजन 5 ते 12 एप्रिल पर्यंत करण्यात आले होते.


यामध्ये हरि किर्तन,हरी पाठ ,भजन,गाथा आयोजन दैनंदिन करण्यात आले होते, हनुमान जन्मोत्सव निमित्ताने 12एपिल रोजी अखंड हरिनाम सप्ताह सांगता हभप आंनद महाराज अंतरगावकर यांच्या काल्याच्या किर्तनाने सांगता करण्यात आली यावेळी महाप्रसाद आयोजन करण्यात आले होते,माजी नगरसेवक शाम जाधव यांच्या दक्षिण मुखी काळा हनुमान मंदिर संभाजी चौक सिडको व आदर्श युवक मंडळ यांनी परिश्रम घेतले.

दक्षिण मुखी हनुमान मंदिर शिवमंदिर सिडको येथे हनुमान जन्मोत्सव निमित्ताने सकाळी अभिषेक व विधीवत पूजन करण्यात आले व दुपारी महाप्रसाद आयोजन करण्यात आले होते यावेळी भगवान नवघरे, संतोष थडवे,जिवन पानपट्टे, नरहरी नाटकर, सुहास लोमटे, गणेश पांडगळे, यांनी परिश्रम घेतले तर हडको ईच्छा पुर्ति हनुमान मंदिर,एन.डी.32 येथेही दर्शनासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती, यावेळी महाप्रसाद आयोजन करण्यात आले होते, मंदिर विश्वस्त दासराव शिंदे, यांच्या अध्यक्षतेखाली विधीवत पूजन व महाप्रसाद आयोजन करण्यात आले होते.

सिडको येथील हनुमान मंदिर, हडको भागातील जाज्वल्य हनुमान मंदिर,ऊस्मानगर नगर रोडवरील बिजली हनुमान मंदिर येथेही भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती, हनुमान जन्मोत्सव निमित्ताने परिसरातील विविध भागातील मंदीरावर रोषणाई व भगवा ध्वज,पताके लावण्यात आले होते तर हनुमान जयंती निमित्त सकाळापासून भाविक भक्तांनी मोठया प्रमाणात गर्दी केली होती.