CIDCO HUDCO ; सिडको हडको परिसरातील विविध भागातील हनुमान मंदिर येथे हनुमान जन्मोत्सव साजरा
नवीन नांदेड l सिडको हडको भागातील विविध ठिकाणी असलेल्या हनुमान मंदिर येथे हनुमान जन्मोत्सव निमित्ताने महाअभिषेक, विधीवत पूजन, हनुमान चालीसा , हनुमान स्तोत्र पठण करुन महाआरती करण्यात आली व भाविक भक्तांसाठी महाप्रसाद आयोजन करण्यात आले.
12 एप्रिल रोजी हनुमान जन्मोत्सव निमित्ताने सिडको परिसरातील गुरूदेव दत्त मंदिर येथे महाअभिषेक, महापुजा व महाप्रसाद आयोजन माजी नगरसेविका ललिता शिंदे व गुरूदेव दत्त मंदिर महिला पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले. दक्षिण मुखी काळा हनुमान मंदिर संभाजी चौक सिडको येथे हनुमान जन्मोत्सव निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताह आयोजन 5 ते 12 एप्रिल पर्यंत करण्यात आले होते.
यामध्ये हरि किर्तन,हरी पाठ ,भजन,गाथा आयोजन दैनंदिन करण्यात आले होते, हनुमान जन्मोत्सव निमित्ताने 12एपिल रोजी अखंड हरिनाम सप्ताह सांगता हभप आंनद महाराज अंतरगावकर यांच्या काल्याच्या किर्तनाने सांगता करण...
