नवीन नांदेड l हनुमान जन्मोत्सव निमित्ताने गावातील हनुमान मंदिर येथे अभिषेक व विधीवत पूजन केल्या नंतर ग्रामस्थांना पुरणपोळीचा महाप्रसादाचे आयोजन संयोजक यांच्या वतीने करण्यात आले होते.


12 एप्रिल रोजी हनुमान जन्मोत्सव निमित्ताने गावातील जाज्वल्य असलेल्या हनुमान मंदिर येथे हनुमान जन्मोत्सव निमित्ताने पुजारी मन्मथ मठपती यांनी विधीवत पूजन अभिषेक करण्यात आले, यानंतर ग्रामस्थ व भाविक भक्त यांच्या साठी महाप्रसाद म्हणून यावेळेस पुरण पोळीचा महाप्रसाद आयोजन करण्यात आले होते.


संयोजक तथा सरपंच प्रतिनिधी बालाजी पाटील भायेगावकर ,यांच्या मार्गदर्शनाखाली गावातील जेष्ठ नागरिक, ग्रामपंचायत सदस्य प्रतिष्ठीत नागरिक, युवक महिला यांनी परिश्रम घेतले.
