हिमायतनगर,अनिल मादसवार| अज्ञान, अंधश्रद्धा आणि अस्वच्छता याबद्दल जागरूकता निर्माण करणारे संत गाडगे महाराज यांच्या पुण्यतिथी हिमायतनगर येथील श्री परमेश्वर मंदिर सभागृहात अभिवादन करण्यात आले.
आज दिनांक २० शुक्रवारी येथील श्री परमेश्वर मंदिर सभागृहात सायंकाळी ६ वाजता संत गाडगे महाराज यांच्या पुण्यतिथि साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सेवानिवृत्त मुख्याद्यापक नागनाथ अक्कलवाड व जेष्ठ संचालक प्रकाश शिंदे यांच्या शुभहस्ते संत गाडगे बाबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण व पूजन करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी सेवानिवृत्त शिक्षक मोतेवार सर, धोबी समाजाचे अध्यक्ष रामभाऊ नरवाडे, शिवसेना शहराध्यक्ष गजानन हरडपकर, विपुल दंडेवाड, विकास नरवाडे, परमेश्वर मंदिराचे संचालक अनिल मादसवार, विलास वानखेडे, पत्रकार अनिल भोरे, मनोज पाटील, अनिल नाईक, अनिल सूर्यवंशी, शिंदे, फुलके, जाधव, आदींसह परमेश्वर भजनी मंडळ सदस्य व गावकरी नागरिक उपस्थित होते.