नांदेडराजकीय

Great response to Mahavikas Aghadi movement : भोकर येथील महाविकास आघाडीच्या आंदोलनास उत्तम प्रतिसाद -NNL

भोकर, गंगाधर पडवळे| भोकर तालुका महाविकास आघाडी कडून कोलकत्ता आणि बदलापूर येथील झालेल्या अन्याय,बाल लैंगिक अत्याचार प्रकरणी निषेध दर्शविण्यासाठी शनिवार दि.२४/ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथून निषेध रॅली चे आयोजन करण्यात आले होते. यात तिन्ही पक्षातील प्रमुख पदाधिकारीच्या सह महिला मोठ्या प्रमाणात सामील झाल्या होत्या. महाविकास आघाडी कडून शनिवार दि. २४ रोजी बंद चे आवाहन करण्यात आले होते. परंतु माननीय उच्च न्यायालयाने राज्यात बंद करता येणार नाही असे काल निर्देश दिल्यानंतर राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी प्रथम न्यायालयाचा मान राखत राज्यातील राष्ट्रवादी पक्ष भोकर बंद मागे घेत असल्याची भूमिका घेतल्यावर सर्वच पक्षाने त्या भूमिकेस पाठिंबा दिला.

झालेल्या घटनेचा निषेध करण्याकरिता व तहसीलदार भोकर मार्फत राज्यपाल महाराष्ट्र राज्य यांना निवेदन देण्यासाठी भोकर तालूका महाविकास आघाडी यांच्या कडून निषेध रॅली काढण्यात आली. सदरील रॅली डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून तहसील कार्यलया समोर काही पदाधिकारी, कार्यकर्ते यांची मनोगत व्यक्त करण्यात आले तेथ महायुती सरकार विरोधी घोषणा बाजी करून सध्याच्या सरकार विरोधात प्रचंड रोष आहे ते सरकार लोकांच्या काहीच उपयोगाचे नाही. एकीकडे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवितात आणि त्याच लाडक्या बहिणीची मुलगी सुरक्षित नाही पवित्र श्रावण महिन्यात अशा अतिशय दुर्दैवी घटना या महाराष्ट्र राज्यात घडत आहेत.

महादेवाला तिसरा डोळा आता उघडावा लागेल असेही गौड म्हणाले.तुम्हांला जर सरकार चालवता येत नसेल तर राजीनामे द्या झोपेचं सोंग घेणाऱ्या या सरकारला आम्ही बोंबा मारून जागे करण्याचं काम करत आहोत, लडकी बहीण योजनेच अमिष दाखवून हे सरकार मते घेण्याची योजना आखात आहे परंतु महागाई शिगेला नेवून ठेवली त्यामुळे मतदार आता जागा झाला असून यांच्या अमिषाला बळी न पडता येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीतून त्यांची जागा त्यांना नक्कीच दाखवून देणार आहे. येणाऱ्या काळात मतदार राजा आमच्या सोबत राहील याची शास्वती आम्हाला आहे.

अशा प्रकारचे मत तालूका अध्यक्ष गोविंद बाबा गौड, शहराध्यक्ष तौशिफ इनामदार, सुभाष पाटील किन्हाळकर, ऍड. परमेश्वर पांचाळ,सतीश देशमुख ऍड. शिवाजी कदम, आनंदाताई चुनगुरवाड, यशोदा शेळके आदींनी आपल्या मनोगतात व्यक्त केला तर महिला आघाडीकडून बांगड्या फोडून सरकारचा जाहीर निषेध केला.सततच्या या होणाऱ्या अन्याय, अत्याचारला लोक कंटाळून गेले असून असे निच कृत्य करणाऱ्याला आमच्या हाती द्या अशी संतापजनक भाषा आता बोलू लागलेत. किंवा सरकारने अधिकची वाट न पाहता त्याचा सापडताक्षनी एन्काऊंटर केला पाहिजे असेही काहींनी भावना अनावर झाल्याने आपले मत व्यक्त केले.

केंद्रात आणि राज्यात भाजप व मित्र पक्षाचे सरकार असून महिला व मुली सुरक्षित नाहीत देशात वाढता अन्याय अत्याचार पाहता दिवसेंदिवस हे प्रकरण वाढत चालले आहेत सरकार याकडे गांभीर्याने पाहत नाही? कोलकत्ता येथील महिला डॉक्टर यांच्यावरील अत्याचार आणि महाराष्ट्र राज्यातील बदलापूर, लातूर जिल्ह्यातील चाकूर, अकोला, कोल्हापूर इत्यादी ठिकाणचे अत्याचार व बदलापूर येथील शाळकरी दोन चिमुकल्या मुलीवरील लैंगिक अत्याचार हे घटना अतिशय संवेदनशील विषय असून सरकार याकडे गांभीर्याने बघत नाही.

अपराध्याना कायदाची भीती राहिली नाही त्यामुळे कायदा व सुव्यवस्था विस्कळीत झाली या वारीला कारणांमुळे राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री हे निष्क्रिय आहेत. असेच दिसते त्यांनी तात्काळ पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी भोकर तालूका महविकास आघाडीच्या वतीने राज्यपाल महाराष्ट्र राज्य यांना तहसीलदार भोकर यांच्या मार्फत दिलेल्या निवेदनात देण्यात आली आहे.जनतेचा रोष पाहता सदरील जनआक्रोश आंदोलनात एकामताने सर्वांनी एकाच मागणी केली की वरील सर्व घटनेतील आरोपी यांनाच्यावर जलदगती न्यायालयात खटाला चालवून त्यांना तात्काळ फाशीची शिक्षा द्यावी. शेवटी भोकर तहसील चे तहसीलदार सुरेश घोळवे यांना निवेदन देऊन आमच्या मागण्या तुमच्या मार्फत महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल यांच्या पर्यंत पोहचवा अशी भोकर तालूका काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, व शिवसेना उद्धव ठाकरे गट यांच्या कडून करण्यात आली.

यावेळी तालूका अध्यक्ष गोविंद बाबा गौड, जिल्हा उपाध्यक्ष सुभाष पाटील किन्हाळकर,निळकंठ वर्षेवार,सुरेश बिल्लेवाड, शहराध्यक्ष तौशिफ इनामदार,अप्पाराव राठोड, राष्ट्रवादी (श.प.ग.)चे तालूका अध्यक्ष ऍड.शिवाजी कदम, महिला तालूका अध्यक्षा यशोदाबाई शेळके,आनंद चिट्ठे, शिवसेना उबाठा गटाचे जिल्हा समन्वयक ऍड. परमेश्वर पांचाळ,तालूका अध्यक्ष संतोष आलेवाड,माजी जिल्हा उपाध्यक्ष सतीश देशमुख,शहर प्रमुख पांडुरंग वर्षेवार, माजी तालूका प्रमुख माधव पाटील वडगांवकर ,तालूका महिला संघटिका आनंदाताई चुनगुरवाड, राणी पेहरकर महिला शहर संघटिका यांच्या सह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते सदरील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भीमराव दुधारे यांनी केले तर उपस्तितांचे आभार शहराध्यक्ष तौसिफ़ इनामदार यांनी मानले.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button