Great response to Mahavikas Aghadi movement : भोकर येथील महाविकास आघाडीच्या आंदोलनास उत्तम प्रतिसाद -NNL
भोकर, गंगाधर पडवळे| भोकर तालुका महाविकास आघाडी कडून कोलकत्ता आणि बदलापूर येथील झालेल्या अन्याय,बाल लैंगिक अत्याचार प्रकरणी निषेध दर्शविण्यासाठी शनिवार दि.२४/ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथून निषेध रॅली चे आयोजन करण्यात आले होते. यात तिन्ही पक्षातील प्रमुख पदाधिकारीच्या सह महिला मोठ्या प्रमाणात सामील झाल्या होत्या. महाविकास आघाडी कडून शनिवार दि. २४ रोजी बंद चे आवाहन करण्यात आले होते. परंतु माननीय उच्च न्यायालयाने राज्यात बंद करता येणार नाही असे काल निर्देश दिल्यानंतर राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी प्रथम न्यायालयाचा मान राखत राज्यातील राष्ट्रवादी पक्ष भोकर बंद मागे घेत असल्याची भूमिका घेतल्यावर सर्वच पक्षाने त्या भूमिकेस पाठिंबा दिला.
झालेल्या घटनेचा निषेध करण्याकरिता व तहसीलदार भोकर मार्फत राज्यपाल महाराष्ट्र राज्य यांना निवेदन देण्यासाठी भोकर ता...
