श्रीक्षेञ माहूर, कार्तिक बेहेरे| माहूरगडाच्या पायत्याशी असलेल्या मौजे लखमापूर गावामध्ये प्रथमचः परमपुज्य धर्माचार्य श्रीकृष्णाकुमार पांडेय (शास्त्री) श्रीक्षेत्र काशी (वाराणसी) यांच्या सुमधूर वाणीतून श्री शिव महापुराण कथा व तुलशी विवाह कार्यक्रमाचे दि.०६ ते १२ नौव्हेंबर २०२४ या सातदिवसाच्या कालावधी दरम्यान दु.१ ते ४ वा.पर्यंत येथील उमा महेश्वर आश्रम लखमापूर याठिकाणी भव्य आयोजन करण्यात आले असून दि.१३ नोव्हेंबर रोजी भव्य कलश यात्रा व श्रीकृष्ण विवाह शोभायात्रा काढण्यात येणार आहे.या कार्यक्रमासाठी प.पु.महंत श्री प्रयागराज गीरी (बापू) महाराज यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे.
या आयोजनाच्या माध्यमातून दि.०६ रोजी रात्री ८ ते १०. ह.भ.प. पंकजपाल महाराज (सत्यपाल महाराजांचे शिष्य) यांचे किर्तन,दि.०७ रोजी रात्री ८ ते १०. ह.भ.प. रामेश्वर महाराज खोडे (व्यसनमुक्ती सम्राट) इसापुर (महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त) यांचे किर्तन,दि.०८ रोजी रात्री ८ ते १०. ह.भ.प. नारायणदास पडोळे महाराज राष्ट्रीय किर्तनकार यांचे किर्तन,दि.०९रोजी रात्री ८ ते १०. ह.भ.प. मधुकरराव खोडे महाराज (व्यसनमुक्ती सम्राट) इसापुर (महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त) यांचे किर्तन दि.१० रोजी रात्री ८ ते १०. ह.भ.प. लक्ष्मणदास काळे महाराज ( गुरकुंज आश्रम, मोझरी) यांचे किर्तन,दि.११ रोजी रात्री ८ ते १०. ह.भ.प.सौ. मिराबाई गंगाधरराव सोनुले (पोटोदा, मांडवी) व संच यांचा भजनाचा व भारुडाचा कार्यक्रम, दि.१२/११/२०२४ सकाळी १० वा. तुलशी विवाह राहील.तर दि.१३ नोव्हेंबर रोजी भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
या दरम्यान दररोज श्री शिवकथेनुसार प्रसंगानुरूप वेशभूषेत सुप्रसिध्द भारूडकार व झांकीदर्शक माणिकराव नेवारे व्दारा झांकी प्रदर्शन आयोजित केले जाणार आहे.या भक्तिमय श्री शिव महापुराण व तुलशी विवाह कार्यक्रमाचा सर्व भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन आयोजक प.पु.शेषभुषण श्री रमेशजी महाराज यांनी केले आहे.