श्रीक्षेञ माहूर, कार्तिक बेहेरे| श्री गुरुदेव अध्यात्म ज्ञान योग साधना महायज्ञ ब्रह्मलीन राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज (Rashtrasant Shri Tukdoji Maharaj) पुण्यतिथी स्मरण महोत्सवाचे भव्य आयोजन श्रीक्षेत्र उनकेश्वर येथे दि.३१ जानेवारी ते २ फेब्रुवारी २०२५ पर्यंत केले असून या महोत्सवाची जय्यत तयारी झाली आहे.


“विश्व स्नेह का ध्यान धरे, सबका सब सन्मान करे” या राष्ट्रसंताच्या विशाल विचाराचे कार्य श्रीक्षेत्र उनकेश्वर येथील अध्यात्म ज्ञान योग साधना महायज्ञ सेवाश्रमात मानवांना सुसंस्कार दिल्या जात असून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अध्यात्मज्ञाने योग साधना महायज्ञ महोत्सवाचे तीन दिवसाचे भव्य आयोजन केले आहे. या महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी दि.१ जानेवारीला सकाळी ११ वाजता आमदार भीमरावजी केराम यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन होणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी नामदेवराव केशवे हे राहणार आहे.

यावेळी विशेष अतिथी म्हणून मा. ना. अँड. इंद्रनील नाईक राज्यमंत्री उद्योग, सार्वजनिक बांधकाम, उच्च व तंत्र शिक्षण, आदिवासी विकास पर्यटन मृदा व जलसंधारण महाराष्ट्र राज्य, तसेच माजी आ.बापूराव राठोड, बोथ आदीलाबाद, जिल्हा कृषी अधिकारी बराडे, अनंत काटकोजवार, गणेश धर्माळे, विठ्ठल देशमवाड, कोंडबाराव खोकले, एकनाथ गावत्रे, परमेश्वर इंगळे, नरेंद्र ढाले, प्रा.नंदकिशोर खैरे,प्रा. प्रकाश लामने, यशवंतराव देशमुख, किसन गरडे, गजानन कवाने ,पंजाबराव गरडे, शिवलिंग पटवे, शिवशंकर नागरे, दत्तात्रय मार्कंडेय, यादव पाटील पिंगळे आधी विविध जिल्ह्याचे अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाचे प्रचारक उपस्थित राहणार आहे.

दैनंदिन कार्यक्रमांमध्ये ५:३० वा. सामुदायिक ध्यान प्रार्थना, सकाळी ६ ते ७ वाजेपर्यंत योग साधना, सकाळी ८ ते ९ वाजेपर्यंत श्रमदान, दि. ३१ जानेवारीला रात्री ८ ते १० वाजेपर्यंत हभप गोपाळ महाराज मूळझरेकर यांचे ग्रामगीता पर जाहीर राष्ट्रीय कीर्तन होणार आहे. दि.१ फेब्रुवारीला सकाळी ११ वाजता मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. दुपारी २ ते ३ वाजेपर्यंत ह भ प शारदासुत खामनकर, माणिक येचलवार आदिलाबाद, खिरु पवार लेवा, यांचे प्रवचन होणार आहे. ३ ते ४:३० वाजेपर्यंत ग्रामगीताचार्य प्रा. स्मिता पडोळे, व मुक्ता काळबांडे यांचे ग्रामगीता पर मार्गदर्शन होईल, दुपारी ४:३० ते ४:५० वाजेपर्यंत सर्व धर्मीय प्रार्थना, ४:५० ते ४:५८ वा. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व स्वर्गीय माजी आ. प्रदीप नाईक यांना मोहन श्रद्धांजली अर्पण केल्या जाईल, रात्री ८ ते १० वाजेपर्यंत ह भ प प्रा.डाँ. प्रशांत ठाकरे महाराज पुणे विद्यापीठातील गोल्ड मेडलिस्ट यांचे ग्रामगीता पर बहरदार राष्ट्रीय कीर्तन होणार आहे. दि. २ फेब्रुवारी सकाळी ६ ते ७ वाजता गोपाळ महाराज मुळझरेकर यांचे सामुदायिक ध्यान व योगावर विचार मांडणार आहे.

सकाळी ८ ते ९ वाजेपर्यंत रामधून निघणार आहे. त्यानंतर ९ ते १० वाजेपर्यंत रामधून चे महत्व यावर केसाळे महाराज विचार व्यक्त करणार आहे, सकाळी १० ते १ वाजेपर्यंत ह भ प ज्ञानेश्वर केसाळे महाराज यांचे काल्याचे कीर्तनाने समारोप होणार आहे. या महोत्सवाचा लाभ तेलंगणा, विदर्भ, व मराठवाड्यातील साधकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेऊन या महोत्सवाचा लाभ घ्यावा असे आवाहन अध्यात्म ज्ञानयोग साधना सेवाश्रम चे अध्यक्ष बाबाराव केशवे, उपाध्यक्ष किसन पवार, ज्ञानेश्वर जाधव, लचमारेड्डी एलटीवार, यांनी जाहीर पत्रकाद्वारे आवाहन केले आहे.