हिमायतनगर। सरसम बु येथिल रहिवाशी असलेले गोविंद गोखले यांच दि. २७ सकाळी ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाल होत, त्यांचेवर सायंकाळी सहा वाजेच्या दरम्यान शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.


आंबेडकर चळवळीत वाढलेल्या गोखले यांचा प्रवास पँथर ते वंचीत बहुजन आघाडीचे पहिल्या फळीचे कार्यकर्ते असा राहिला, सर्वसामान्य कुटूंबातील असल्याने ते अनेकांशी मैत्रीपुर्ण सलोख्याचे संबंध होते, त्यांच्या जाण्याचे आंबेडकरी चळवळीत मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

अंत्यविधीसाठी आप्तस्वकिय नातेवाईक, सामाजीक कार्यकर्ते, पँथर, डॉक्टर, वकिल, पत्रकार, शिक्षक, चळवळीतील महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
