नांदेड| शेतकऱ्यांना कर्ज वाटप केल्याच्या वावड्या उठवणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या प्रशासनाला शिवसेनेने तिखट सवाल केला आहे. शेतकऱ्यांना दिलेल्या कर्जाचा हिशोब देण्यात यावा अशी मागणी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने नवा मोंढा येथील एसबीआय बँकेच्या शाखा व्यवस्थापका कडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया च्या प्रशासनाकडून शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याचा आरोप यावेळी शिवसैनिकांनी केला.


जिल्हाप्रमुख बबन बारसे यांच्या नेतृत्वात आज शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्याच्या संपूर्ण बाबीचा हिशोबच मागण्यात आला आहे . शेतकऱ्यांचे पीक कर्जाचे आलेले एकूण अर्ज किती ? पीक कर्ज मंजूर केलेले लाभार्थी किती ? नामंजूर अर्ज किती ? प्रलंबित अर्ज कशासाठी प्रलंबित ठेवण्यात आली ? पीक कर्जाचे उद्दिष्ट किती आणि पूर्तता किती? सिबिल आणि थकबाकीमुळे किती शेतकऱ्यांचे पीक कर्जाची प्रकरण मंजूर करण्यात आली नाहीत अशा प्रश्नांचा भडिमार एसबीआयच्या शाखा व्यवस्थापकांकडे करण्यात आलेला आहे.


एसबीआय बँकेने वेळीच शेतकऱ्यांच्या पीक कर्जाबाबत संपूर्ण आणि खरी माहिती दिली नाही तर एसबीआय बँकेच्या नवा मोंढा येथील शाखेसमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. शिवसेना स्टाईल अद्दल घडवण्यात येईल असा इशारा जिल्हाप्रमुख बबन बारसे , भजन पाटील यांच्यासह नरहरी वाघ डॉक्टर बालाजी पेनुरकर , विजय बगाटे , सुनील कदम , हरिभाऊ धुमाळ , नवज्योत सिंग गाडीवाले , आनंद जाधव, मनोज यादव , पिंटू सुनपे , रामभाऊ लेंडाळे , मनोज काकडे, दिलीप लोंढाळ , माधव पांचाळ , राम काटेकर , नवनाथ जोगदंड , गणपतराव गोखले , गणेश भोसले, सोपान बोकारे ,प्रभाकर सोनटक्के ,भारत पांडे यांच्यासह अनेकांच्या निवेदनावर स्वाक्षरी आहेत.




