नांदेड l गुरुवर्य स्मृतीशेष एम.पी. भवरे कामारीकर बहुउद्देशिय सेवाभावी संस्था,बहुजन टायगर युवा फोर्स (सांस्कृतिक विभाग) महाराष्ट्र राज्य व पारंपारिक शाहीर लोककला संवर्धन मंडळ च्यावतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही येत्या ९ नोव्हेंबर रोजी रविवारी लोकपारंपारिक कलावंत,शाहीर मेळाव्याचे हिमायतनगर तालुक्यातील पोटा (बु.) येथे सरस्वती इंग्लिश मेडियम स्कुलमध्ये आयोजन करण्यात आलेले असून कार्तिक एकादशीला पंढरपुर येथे शासकीय पूजेवेळी बहुमान मिळालेले पोटा (बु.) येथिल मानाचे वारकरी रामराव वालेगांवकर व सौ.सुशिलाबाई रामराव वालेगांवकर यांनाही यावेळी गौरविण्यात येणार असल्याची माहिती संयोजक त्रिरत्नकुमार मा.भवरे कामारीकर,स्वागताध्यक्ष कैलास माने,शेख रफिखभाई, बालाजी राठोड,निमंत्रक अनिल मादसवार,लक्ष्मण भवरे,संतोष पुल्लेवार यांनी आज दिली.


या मेळाव्याचे उदघाटन नांदेडचे खा.रविंद्र वसंतराव चव्हाण यांच्या हस्ते करण्यात येणार असून अध्यक्षस्थानी माजि आ.माधवराव पाटील जवळगांवकर तर,विशेष अतिथी म्हणून हिंगोली लोकसभा मतदार संघाचे खा.नागेश पाटील आष्टीकर, आ.बाबुराव कोहळीकर,जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शांताबाई जवळगांवकर,माजी महापौर शीलाताई भवरे, काॅग्रेसच्या नेत्या सौ.रेखाताई चव्हाण यांच्यासह जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली, अति.मुख्य कार्यकारी अधिकारी संदिप माळोदे,सुमनबाई भवरे, माजी उपनगराध्यक्ष किशोर भवरे,शिवसेनेच्या एस.सी. एस.टी.ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष मंगेश कदम, डॉ.प्रमोद अंबाळकर व प्रमुख उपस्थितीत जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ.संजय तुबाकले, जिल्हा समाजकल्याण अधिकारी सत्येंद्र आऊलवार, तहसीलदार सौ.पल्लवी टेमकर, गटविकास अधिकारी पांडुरंग नारवटकर,पोलिस निरीक्षक अमोल भगत,विजय कांबळे, अभि.एस.के.शिंदे, अशोक पवार, इंजि.दिलीप धुळेकर, गटशिक्षणाधिकारी केशव मेकाले, वनपरिक्षेत्र अधिकारी मंगेश पाटील, दिलीपराव कावळे, डाॅ.प्रकाश वानखेडे, रमेश सोनाळे,प्रशांत इंगोले, श्याम कांबळे, पत्रकार परमेश्वर गोपतवाड, कानबा पोपलवार, उमेशभाऊ देशमुख, दत्ताभाऊ पवार,सुरेश हटकर, महेश देशमुख तरोडेकर,निवेदक उत्तम कानिंदे आदी मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.


या मेळाव्यात शाहीर व्यंकटराव बेटकबिलोलीकर, हास्यसम्राट सिद्धार्थ खिल्लारे,विजय जोशी, भिमशाहिर रवीराज भद्रे, माधव वाढवे,बूलढाण्याच्या अनुराधा भावसार,चंद्रभागा जाधव,शंकर गायकवाड,कु.ईश्वरा पाटील, अर्चना अंबारे,दिपाली जोशी, मनिषा सुर्यवंशी,रमेश नारलेवाड,अमरावतीचे साहिल कव्वाल आदींसह अनेक कलावंत व शाहीर सहभागी होणार आहेत.


या मेळाव्याची जय्यत तयारी सुरु असून लोकपारंपारिक कलावंत व शाहिरांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहावे असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष व संयोजक त्रिरत्नकुमार मा.भवरे, डाॅ.मनोज राऊत,लक्ष्मणराव भवरे,राम गुंडेकर,आनंदा जळपते,शाहिर नरेंद्र दोराटे, दिलीप कोसले,नागोराव मेंडेवाड,शिवाजी डोकळे, परमेश्वर वालेगावकर, केशव माने,नागनाथ वच्चेवाड,पांडूरंग मिरासे,शाहीर बापूराव जमदाडे, सुमेध एडके,पत्रकार विजय वाठोरे,जळबा जळपते,सुभाष गुंडेकर,गौतम राऊत,बालाजी राऊत,शेख खय्युमभाई, जयभीम पाटील,किरण वाघमारे,बळीराम जाधव, सचिन कांबळे,अविनाश कदम, किशनराव ठमके,अशोक वासाटे आदींनी केले आहे.



