नांदेडलाइफस्टाइलव्हिडीओ

Raksha Bandhan : रक्षाबंधन निमित्ताने बाजारात विविध प्रकारच्या राख्या दाखल – ग्राहकांची खरेदीसाठी गर्दी

नांदेड/हिमायतनगर| रक्षाबंधन हा सण जवळ येत असतानाच शहरातील बाजारपेठांमध्ये राख्यांची खरेदी जोरात सुरू झाली आहे. बाजारात यंदा विविध प्रकारच्या आणि आकर्षक राख्यांनी भरगच्च सजावट (occasion of Raksha Bandhan) झाली असून, भाऊ-बहिणीच्या नात्याचं प्रतीक असलेल्या या सणाच्या तयारीस उधाण आलं आहे.

पारंपरिक राख्यांपासून ते कार्टून कॅरेक्टर, लाइटिंग राख्या, जय श्रीराम राखी, फोटो राख्या, कस्टमाइज्ड राख्या, तसेच इको-फ्रेंडली राख्याही यंदा बाजारात मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहेत. याशिवाय ऑनलाईन खरेदीलाही चांगला प्रतिसाद मिळत आहे.

राख्यांच्या किमती १० रुपयांपासून सुरू होऊन १०० ते २०० रुपये पर्यंत पोहोचत आहेत, तर काही खास डिझायनर राख्यांची किंमत ३०० रुपयांपेक्षा अधिक आहे. बालकांसाठी कार्टून राख्या सर्वाधिक लोकप्रिय ठरत आहेत.

व्यापाऱ्यांची प्रतिक्रिया : “यंदा मागणी चांगली आहे, महिलांचा उत्साह वाढलेला आहे. लहान मुलांसाठी कार्टून राख्या आणि मोठ्यांसाठी हस्तकलेच्या आणि हिऱ्यासारखे दिसणाऱ्या मनमोहक राख्यांना पसंती मिळत आहे,” असं मत हिमायतनगर येथील राखी विक्रेता ज्ञानेश्वर गोडसेलवार यांनी व्यक्त केलं.

सणासाठी तयारी जोमात – राखी खरेदीसह मिठाई, भेटवस्तू, आणि पारंपरिक पोशाखांची खरेदी देखील सुरू आहे. बहिणी आपल्या भावासाठी खास राखी शोधत आहेत, तर भावंडं देखील बहिणीसाठी खास भेटवस्तूंची खरेदी करताना दिसत आहेत.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button