हिमायतनगर, अनिल मादसवार| तत्कालीन खासदार तथा विद्यमान आमदार हेमंत पाटील यांच्या पुढाकारातून हिमायतनगर वाढोणा येथील श्री परमेश्वर मंदिरास मंजूर झालेल्या 50 लाख रुपयांच्या परिसर विकास कामाचे भूमिपूजन मंदिराचे उपाध्यक्ष महावीरचंद श्रीश्रीमाळ, वसंत कारखाण्याचे चेअरमन अजराव देशमुख सरसमकर यांच्या हस्ते करण्यात आले आहे. विकास कामाला सुरुवात झाल्याने मागील काळात हेमंत पाटील यांनी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता केली असल्याची भावना भाविकांतून व्यक्त केली जात आहे.


हिंगोली लोकसभा मतदार संघात येणाऱ्या तथा हदगाव विधानसभा क्षेत्रातील हिमायतनगर येथील श्रीक्षेत्र परमेश्वर मंदिरास भेट दिल्यानंतर तत्कालीन खासदार हेमंतभाऊ पाटील यांनी पर्यटन विकासाच्या माध्यमातून श्री परमेश्वर मंदिरात 50 लाख रुपयाचा निधी मंजूर केला होता. निधी मंजूर झाल्याची माहिती पाच वर्षाच्या कार्यकाळात केलेल्या आणि होणाऱ्या कामाचं काढण्यात आलेल्या माहिती पत्रकात नमूद करण्यात आले होते. मधील काळात आलेल्या विविध अडचणीमुळे हे काम होऊ शकले नाही.


परंत्तू दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करण्यासाठी आमदार पदी नियुक्ती झाल्यानंतर श्री परमेश्वर मंदिर कमिटीला मंजूर ५० लाखाच्या निधीतून विकास काम लवकरच सुरु होईल असे मंदिरास भेट दिल्यानंतर हेमंत भाऊ पाटील यांनी मंदिराचे उपाध्यक्ष महावीरचंद श्रीश्रीमाळ यांच्याशी चर्चा करताना सांगितले होते. परंतु मध्येच महाशिवरात्र यात्रा महोत्सवामुळे पर्यटन विकासाच्या माध्यमातून श्री परमेश्वर मंदिराच्या सुशोभीकरणाच्या कामाला दिनांक २५ रोजी भूमिपूजन करून सुरुवात झाली आहे. या निधींतून श्री परमेश्वर मंदिरातील मोकळ्या जागेत पेव्हर ब्लॉक, शेड, आणि कार्यालयात लक्झरी खुर्च्या असे काम केले जाणार आहे. या विकास कामामुळे श्री परमेश्वर मंदिराच्या परिसराच्या सौंदर्यात आणखी भर पडणार आहे.

तत्कालीन खासदार हेमंत पाटील यांनी दिलेल्या आश्वासनाची पुर्तता केल्याबद्दल मंदिर कमिटीतर्फे आभार मानण्यात आले. यावेळी वसंत कारखाण्याचे चेअरमन अजयराव देशमुख सरसमकर यांनी काम पूर्ण झाल्यावर आमदार हेमंतभाऊंना लोकार्पण कार्यक्रमप्रसंगी बोलावंण्याचं आश्वासन त्यांनी दिले. यावेळी मंदिराचे उपाध्यक्ष महाविरचंद श्रीश्रीमाळ, सेक्रेटरी अनंता देवकते, संचालक अनिल मादसवार, संजय माने, विलास वानखेडे, रमेशअप्पा कोमावार, रमेश अप्पा पळशीकर, आ. हेमंत पाटील यांचे स्वीय सहाय्यक गोविंद गोडसलवार, सुनील दमकोंडवार, लिपिक बाबुराव भोयर गुरुजी, देवराव वाडेकर आदींसह अनेक भाविक भक्त, पत्रकार व नागरिक उपस्थित होते.
