मुंबईराजकीय

Bhiwandi Vilas Patil ; भिवंडीचे माजी महापौर विलास पाटील यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश- NNL

मुंबई | विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षात प्रवेश करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. प्रदेश काँग्रेसचे मुख्यालय असलेल्या टिळक भवनमध्ये आज भिवंडीचे माजी महापौर विलास पाटील तसेच नाशिक, भिवंडी व कल्याण, डोबिंवलीमधील भारतीय जनता पक्ष, एकनाथ शिंदे यांची शिवसेना व सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, माजी नगरसेवक, माजी सभापती यांच्यासह शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

नाशिकमधील भाजपा पदाधिकारी व माजी सभापती खलील मिर्झा, उषाताई वेंडकुळे, तन्वीर तांबोळी खान, मुस्ताक कुरेशी, छात्रभारतीचे माजी प्रदेशाध्यक्ष राजेंद्र पवार, समाधान बागुल, विशाल रनमाळे यांच्यासह मुस्लीम ओबीसी संघटनेचे पदाधिकारी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे माजी शहराध्यक्ष यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. कल्याण डोंबिवलीमधील राकेश मुथा यांच्यासह पदाधिकारी यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी या सर्वांचे काँग्रेस पक्षात स्वागत केले.

“मागील १० वर्षात महाराष्ट्राला व केंद्राला भारतीय जनता पक्ष नावाची किड लागली आहे, लोकशाही व संविधानाला न जुमानता ते काम करत आहेत. महागाईने जनता त्रस्त आहे, बेरोजगारांची संख्या दिवसेंदिवस प्रचंड वाढत आहे, शेतकऱ्याला उद्ध्वस्थ केले आहे. आता भाजपा नावाची ही किड सत्तेतून बाहेर काढण्यासाठी एवढ्या मोठ्या संख्येने विविध पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. ज्या उद्देशाने या सर्वांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे, त्यांचा उद्देश विधानसभा निवडणुकीत पूर्ण होईल”, असा विश्वास प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला.

टिळक भवन येथे झालेल्या या पक्षप्रवेश सोहळ्यावेळी प्रदेश उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे, प्रदेश सरचिटणीस राजेश शर्मा, राजन भोसले, नाशिकचे प्रभारी ब्रिजकिशोर दत्त, रोहित टिळक, नाशिक काँग्रेसचे अध्यक्ष आकाश छाजेड, कल्याण काँग्रेसचे अध्यक्ष सचिन पोटे, श्रीकृष्ण सांगळे, मदन जाधव आदी उपस्थित होते.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button