नांदेडमहाराष्ट्र

Vande Bharat : अखेर वंदे भारत नांदेड पर्यंत धावणार : खा. डॉक्टर अजित गोपछडे यांच्या प्रयत्नांना यश

नांदेड| नांदेड ते मुंबई रेल्वे प्रवास अति जलद व्हावा आणि मराठवाड्यातील रेल्वे प्रवाशांना अधिकाधिक सुविधा मिळाव्यात यासाठी वंदे भारत रेल्वे नांदेड पर्यंत आणण्यासाठी खा. डॉ अजित गोपछडे यांनी केलेल्या प्रयत्नांना अखेर यश आले असून रेल्वे मंत्रालयाने वंदे भारत नांदेड एक्सप्रेस रेल्वे नांदेडपर्यंत विस्तार करत असल्याचे अधिकृत पत्र आज जारी केले आहे.

मुंबई – जालना असलेल्या वंदे भारत रेल्वे चा विस्तार नांदेड पर्यंत करावा यासाठी खा. डॉ. अजित गोपछडे यांनी केंद्रीय रेल्वेमंत्र्यांकडे यापूर्वीच गेल्या एक वर्षापासून पाठपुरावा केला होता. शिवाय राज्यसभेतही त्यांनी प्रश्न उपस्थित केला . खा.डॉ. अजित गोपछडे यांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सकारात्मक प्रतिसाद देत वंदे भारत जालन्याहून नांदेड पर्यंत विस्तार करण्याचे अनुषंगाने सर्वे करण्यासाठी आपण संबंधित विभागाला आदेश दिल्याचे सांगितले होते.

या अनुषंगाने ,वंदे भारत रेल्वे सेवा विस्तारासाठी प्रवासी मागणी, कार्यरत व्यवहार्यता, स्लैक टाईम कमी करणे, गाडी चा वेग आदी बाबतीत रेल्वे बोर्ड सीईओ यांच्या सोबत विचरमंथन करुन येत असलेल्या तांत्रिक अडचणी वर मात करण्यासाठी अनेक वेळा खा. डॉ अजित गोपछडे यांनी पाठपुरावा केला.या सातत्यपूर्ण परिश्रमाने वंदे भारत ची रेल्वे सेवा नांदेड पर्यंत पोहोचणार आहे याचा लाभ संपूर्ण मराठवाड्यला होणार आहे. नांदेड सह मराठवाड्यातील विविध विकासासाठी खा. डॉ. अजित गोपछडे यांचे सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. मराठवाड्याचा विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी ही राज्य आणि केंद्र सरकारकडे त्यांचा सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. त्यामुळे मराठवाड्यात अनेक विकासाची कामे होत आहेत.

मराठवाड्याला विकासाची गती मिळवून देण्यासाठी आणि नांदेडच्या उद्योग , व्यापाराला नवे दळणवळण मिळवून देण्यासाठी आणि नांदेडच्या रेल्वे प्रवाशांना जलद प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी वंदे भारत एक्सप्रेस नांदेड पर्यंत आणावी यासाठी खा.डॉ. अजित गोपछडे यांचे सातत्याने प्रयत्न सुरू होते . मुंबई ते जालना इथपर्यंत धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसला नांदेड पर्यंत आणण्यासाठी खा. डॉ. अजित गोपछडे यांनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सरदार रवनीत सिंघ बिट्टू , केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव ते थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पर्यंत सलग पाठपुरावा केला होता. वंदे भारत नांदेड पर्यंत आल्यामुळे निश्चितपणे नांदेडच्या रेल्वे प्रवाशांना मोठी सुविधा उपलब्ध होणार असून जलदगतीने मुंबईपर्यंतचा प्रवास अगदी सहजरीत्या करता येणार आहे. त्यामुळे खा.डॉ. अजित गोपछडे यांनी वंदे भारत नांदेड पर्यंत आणण्याचे अनुषंगाने केलेल्या प्रयत्नाला अखेर यश आले आहे. आज वंदे भारतचा विस्तार नांदेड पर्यंत करत असल्याचे अधिकृत पत्र रेल्वे मंत्रालयाने काढले आहे. त्यामुळे मराठवाड्याच्या आणि नांदेडच्या रेल्वे प्रवाशांच्या अनुषंगाने आणखीन एक मोलाचे पाऊल पुढे पडले आहे.

गाडी क्रमांक 20705 हजूर साहिब नांदेड ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ही वंदे भारत अतिजलद एक्स्प्रेस सकाळी 5 वाजता नांदेड हून प्रस्थान करुन परभणी 5:40, जालना 7:22 मुंबई दुपारी 14:25 वाजता पोहोचणार तर परत प्रवासात गाडी क्रमांक 20706 सीएसएमटी मुंबई हून प्रस्थान दुपारी 13:10 वाजता करुन रात्री 22:50 वाजता नांदेड येथे आगमन होईल संपूर्ण मराठवाड्यातील नागरिकांनी या सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन राज्य सभा सदस्य खा. डॉ अजित गोपछडे यांनी केले आहे. दरम्यान वंदे भारत रेल्वेचा नांदेड पर्यंत विस्तार केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सरदार रवनीत सिंघ बिट्टू यांचे खा. डॉ. अजित गोपछडे यांनी आभार मानले आहेत.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button