Vande Bharat : अखेर वंदे भारत नांदेड पर्यंत धावणार : खा. डॉक्टर अजित गोपछडे यांच्या प्रयत्नांना यश
नांदेड| नांदेड ते मुंबई रेल्वे प्रवास अति जलद व्हावा आणि मराठवाड्यातील रेल्वे प्रवाशांना अधिकाधिक सुविधा मिळाव्यात यासाठी वंदे भारत रेल्वे नांदेड पर्यंत आणण्यासाठी खा. डॉ अजित गोपछडे यांनी केलेल्या प्रयत्नांना अखेर यश आले असून रेल्वे मंत्रालयाने वंदे भारत नांदेड एक्सप्रेस रेल्वे नांदेडपर्यंत विस्तार करत असल्याचे अधिकृत पत्र आज जारी केले आहे.
मुंबई - जालना असलेल्या वंदे भारत रेल्वे चा विस्तार नांदेड पर्यंत करावा यासाठी खा. डॉ. अजित गोपछडे यांनी केंद्रीय रेल्वेमंत्र्यांकडे यापूर्वीच गेल्या एक वर्षापासून पाठपुरावा केला होता. शिवाय राज्यसभेतही त्यांनी प्रश्न उपस्थित केला . खा.डॉ. अजित गोपछडे यांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सकारात्मक प्रतिसाद देत वंदे भारत जालन्याहून नांदेड पर्यंत विस्तार करण्याचे अनुषंगाने सर्वे करण्यासाठी आप...
